Monday 29 February 2016

"ब्रेक तो बनता है "

चिंतनिका जीवन एक " संघर्ष " 🌹 
.            योगेश जोशी
.           वज्रेश्वरी / ठाणे

      " ब्रेक  तो  बनता  है  "

विकेंड  ला  गावी वज्रेश्वरी  ला  निघालो  होतो.
  अहमदाबाद  हायवेवर  ही तूरळक  वाहतूक  वर्दळ  होती  त्यामुळे  मी गाडी  सूसाट  दामटवित होतो .

मागील  सीट  वर  ऋचा  व  वीणा  ची  दंगा  मस्ती  सूरू  होती.

अचानकपणे  समोर  एक  बाईकस्वार   स्लीप  झाला  आणि  मी  तातडीने ब्रेक  दाबून  गाडी  थांबवली. .
.........हूश्श. ........वाचलो. .

मागे  बेसावधपणे  बसलेल्या  मूली  अचानकपणे  पूढे  आपटल्या........

" काय  हे  बाबा"  ?                 "कसा ब्रेक  लावता  हो " ?
पडले ना मी .....  मोठी कन्या " ऋचा "  वैतागून  म्हणाली

वेडा  आहे . बाबा  नूसता  ......   नीट  चालव  ना  गाडी. ...लागलं  मला डोक्याला ..   ...अस .काय  करतोस.??? .....  आमचं   लहान पिल्लू  "वीणा " रागावून  म्हणाली .

"साॅरी हं ,  अग  ब्रेक  नसता लावला तर  अपघात  झाला  असता
....गाडी जागेवर  थांबली  म्हणून  नशीब  ! .".....मी उसासा  टाकून  म्हणालो.

"बर  झालं  बाबा ब्रेक  बनवतात  सर्व  गाड्यांना  थांबवायला  " .. ... आमची छोटी वीणा म्हणाली

"अग  ब्रेक  आहेत  म्हणून  नाही  तर  गाडी थांबविण्यासाठीच  ब्रेक  दिलेले  असतात. "....मी  समजवून  दिले.

"नाही बाबा , मला नाही पटलं तूमचं."
'ब्रेक ' चा  ऊपयोग फक्त  गाडी  थांबविणे नसून  आणखी  काही  वेगळे  महत्वाचे कारण आहे  त्या  पाठी ."....  ऋचा मला म्हणाली

छे! !  काहीतरीच  काय ?
या  पेक्षा  दूसरे  कारण  नाही ... ब्रेक चा  उपयोग  गाडी  थांबवणे  ईतकच. ......मी  ऋचा  ला  समजावू  लागलो.

पण  तीने  तिचा  हेका  कायम  ठेवत  म्हणाली,

" बाबा  विचार  करून  सांगा  बर,  आणखी  काय  महत्वाचे  कारण  असेल  गाडीला ब्रेक  लावण्यापाठी.?"

"डोक  नको  खाऊस , दूसर  काहीही  कारण  नाही....नीट  बसून  घ्या  आणि  हो आता मस्ती  नको. ......माझा आवाज  थोडा  चिडचिडा

ऋचा मात्र ईरेला पेटली....

  ," आणि मी जर  दूसर  कारण  सांगितल  तर  आईसक्रीम  द्याल. ...

Done  !!  दिले  समज  , पण  मला तू  दिलेले  कारण  पटायला हवे    ! फालतू  'पीजे ' नाही चालणार. .हो .". चल  बोल  पटकन". ...ऊत्सूकता  वाढल्याने  मी  म्हणालो

"बाबा 'गाडीला  ब्रेक  आहेत  म्हणून  आपण  गाडी  थांबवू  शकतो , हे जरी खरं  असलं  तरी,  ब्रेक  आहेत  म्हणूनच   तर आपण  गाडी वेगाने  चालवू  शकतो ...... .

जेव्हा  माझ्या  साईकल  चे ब्रेक  नीट  लागत  नाहीत  मी  वेगाने नाही  चालवू  शकत  या ऊलट जेव्हा  तूम्ही  ब्रेक  दूरूस्त  करून  आणता  तेव्हा  मी  मस्त  वेगात  साईकल  चालवू  शकते. ....
.
म्हणजेच  ब्रेक  हे  वाहन  वेगाने  चालविण्यासाठी असतात  की  नाही  "

आता आपल्या  गाडीला  ब्रेक  नसते तर  तूम्ही  ती  चालवू शकाल  का  ?
आतल्या  आरशात  तिचा चेहरा  माझा  हरण्यातही फूललेला  चेहरा  टिपत  होता.

मंडळी  आयूष्याच्या  प्रवासाचेही अगदी असेच  आहे.

या  प्रवासात  अनेक  संकट  , अडथळे,  कठीण  काळ, अपयश , निराशा   असे  ब्रेक  लागत  असतात."
.......आपल्याला  वाटत  हे  सारं  माझा प्रवास  थांबविण्यासाठीच  आहे. ......

पण  मित्रांनो  हे  असे  ब्रेक  असतात  ते  तूम्ही  , नवीन  जोमाने  ऊर्जेने , भरदाव वेगाने  तूमच्या  लक्षापर्यत जावे म्हणूनच...
  काय  वाटतं  तूम्हाला. ....

ईतक्यात पूढे  चालणार्या एका  ट्रक  च्या  मागे  लिहीलेल्या  ओळी  दिसल्या  .......
ईतर  वेळी ट्रक  पाठीमागे लिहीलेल्या  निरर्थक  ओळींचा  आज  निराळा  अर्थ  समजत  होता.

.......नजर  को बदलो
.......नजारे  बदल  जाएंगे  ।
........सोच  को  बदलो
......  सितारे  बदल  जाएंगे  ।

"चला ऊतरा ,  आईसक्रीम  पार्लर  आलं  आणि  एक सोडून  दोन  घ्या  खूशाल ",  ..... मी  गाडी  थांबवत  म्हणालो

व्वा  ...Love  you  बाबा   ...एकदम  दोन दोन  आईसक्रीम  .....दोघीही एकसूरात ओरडल्या. .........

बायको  डोळे मोठ्ठे  करून   म्हणाली
, " अरे टाईमपास  होईल, ऊशीर  होईल  जायला  आपल्याला   ."

"अग  ईतका  लाॅग ड्राईव्ह  आहे  ,
या  प्रवासात  " एक ब्रेक  तो  बनता  है  ।   मी हसत  म्हणालो .

Let's  enjoy. .......

माझी लेखनयात्रा  🌈
योगेश जोशी
वज्रेश्वरी / ठाणे

7 comments:

  1. Have abreak havve a kitkat.
    nice lines

    ReplyDelete
  2. ब्रेक घेतला तर आपण थांबतो पण पुढे जोमाने ही जातो .
    मात्र लवकर निघा आणि सावकाश पोचा . ब्रेक असले तरीही .

    ReplyDelete
    Replies
    1. अलंकार सर धन्यवाद

      Delete
  3. ब्रेक घेतला तर आपण थांबतो पण पुढे जोमाने ही जातो .
    मात्र लवकर निघा आणि सावकाश पोचा . ब्रेक असले तरीही .

    ReplyDelete
  4. अप्रतीम लेखन योगेशजी... गाडीच्या ब्रेकचा आयुष्यातील ब्रेकशी हळुवारपणे जोडलेला सहसंबंध अत्यंत पटणारा आहे....अतीशय छोट्याश्या कीस्स्यातुन एक वैचारीक गोष्ट घडवणे हे फक्त आपल्यासारखे निस्सीम कलाकारच करु शकतात हे म्हटल्यास अजीबात वावगे ठरणार नाही.....

    ReplyDelete
    Replies
    1. उमेश सर धन्यवाद

      Delete