Friday 4 March 2016

मागे काही राहीलयं का?

चिंतनिका जीवन एक " संघर्ष " 🌹
योगेश जोशी वज्रेश्वरी / ठाणे

        "मागे काही राहीलं तर  नाही  ना   ? "

"अरे  सगळे  सामान  घेतल  का  ?"  "बस  मधे  कोणाच काही  राहील तर  नाही  ना  ?"

"हो .......सर  ,सगळ  घेतल , न  विसरता  !!
सहलीवरून  ऊतरलेली मूल  एकसूरात  ओरडली

"छान , पण  जोशी सर  ,  एकदा  बस  मध्ये  जाऊन  बघता  का   ,"काही मागे राहीलयं  का ते  ? "म्हणजे बस  परत  गेल्यावर  नंतर  धावपळ  नको  !  कस

मूख्याध्यापकांनी सूचना  वजा  विनंती  केली.

"होय  येतो  पाहून,  "
अस  म्हणत  सर  बस  मधे  गेले

एका नजरेत  बस  पाहील्यावर  लक्षात  आलं  सगळ्यांचच  खूप  काही  राहील  आहे  मागे.

वेफर्स ,कूरकूरे,  चाॅकलेट  यांचे  रॅपर्स,  फ्रूटी  , प्लास्टिक  बाॅटल्स.........आता  मात्र  ते  कोणाचच नव्हते  ...

जोपर्यंत  ह्या  भरलेल्या  होत्या  तोपर्यंतच  या  सर्व  " माझ्या " या  सदरात  मोडत  होत्या. .....
आणि  आता  मात्र  कोणाच्याच  नव्हत्या.

.............जमेल  तेव्हढे  एका पिशवीत भरून  सर  खाली  ऊतरले.

"काही  राहील  होत  का  मागे  ?"

या  मूख्याध्यापकांच्या प्रश्नावर   हसत हसत नकारार्थी  मान  हलवत  जमलेल्या  पालकांकडे  गेले.

पण  मन  मात्र  .............

"मागे  काही  राहीलयं  तर  नाही ना  ?"

याच  प्रश्नाभोवती घूटमळत राहीले. ..आयूष्याच्या  प्रत्येक  टप्प्यावर  हा  प्रश्न  निरनिराळ्या  रूपात  समोर  ऊभा ठाकला  ईतके  मोठे  प्रतल या  प्रश्नाचे
 
बालपण  सरताना अनेक  गोष्टी  मागे  राहील्या  काही  खेळ  विकत  घ्यायचे तर  काही  खेळायचे  राहीले. ............

तारूण्याच्या  उंबरठ्यावर  मनापासून  आवडलेल्या व्यक्ती ला अंतरीचे  गूज सांगायचे  राहून  जाते.....

.......व्यवहारी  आयूष्य  पूढेच  सरकत  असल  तरी मन  मात्र  सदैव  मागे  मागे  घूटमळत असत

..आईसोबत  चालणाऱ्या  लहान  बाळा सारखे. .........आई  पूढे  पूढे  जात  असते, पण  तो  रस्तावरील  मांजरीची पिल्ले, रंगीत  काचा,  दगड,  काठ्या  यातच  मागे  मागे  घूटमळत  असतो. ...अगदी  तस्सेच. ....

.                       ● सूचना ●

● पैसे, पाकीट, किल्ली, पास, रूमाल, घेतलात काय?
● लाईट गॅस पंखा नळ बंद केलेत का?
● घाई नको, आपल काही मागे राहीलं तर नाही ना  ?

अशा प्रकारचा  एक बोर्ड  सोसायटीच्या जिन्यात  वाचला.
मनात  सहज  विचार  आला

, "तीन  महीन्याच्या तान्ह्या बाळाला घरात ठेवून कामावर निघालेल्या मातेला हे वाचून काय वाटेल  ?

व्यवहारी जगातील  "सर्व काही " मिळवण्याच्या अट्टाहासापायी काळजातील " सर्व काही "  मागे  ठेवूनच  निघते  ती. ... 
सांगा  कसं  म्हणावं  तिने  "सगळे  घेतलय"  म्हणून. ........

लग्नमंडपात मुली ची पाठवणी  होताना  आईच्या  डोळ्यात  आभाळ  सांडून  ती  रिती  होते.
सगळी  देणी  भागवून  बाप  निवांत  होतो न  होतो  तोच 

एखादी  आत्या  त्याला  म्हणते, "

" दादा हाॅल  सोडायच्या  आधी , एकवार  आत  खोलीत  जाऊन  बघून  ये  बर  ", "काही  मागे राहीलयं का ते?

रिकाम्या  खूर्च्या,  पसरलेल्या  अक्षदा,  ओलांडून  तो  वधूपक्षाच्या  खोलीत  येतो. .......

मूली ने  गौरीहार  पूजला तेथे  आता फक्त फूले  मलूल  पडलेली  दिसतात. ...

.व्याकूळतेने  मनात  म्हणतो  ," सगळच  तर  मागे  राहीलयं." ....... ...

पंचवीस  वर्षे  जे  "नाव " घेवून  ....
...त्या " नावाने " हाका  मारत  तिच्या  मागे  मागे  पळत  होता  , 
ते  तिचे  'नावही '  व  तिच्या " नावापुढे"  ज्या  अभिमानाने   लावत  असलेले  "त्याचे " नावही   

हातावर ऊदक  सोडताच क्षणार्धात  तिथेच  त्या अक्षतापूष्पा  सोबत " निर्माल्य " झालेले  दिसल्याने  एकटाच मनातल्या मनात  भरभरून  कोसळतो. ...........

"अरे  आलास  का पाहून  ? "
आपल  मागे  काही  राहीलं तर नाही ना  ?

............या  प्रश्नाचे मौन  हेच  ऊत्तर  असते.........   निशब्द ......कारण  जे  राहीलं  ते  आता  परत  येणार  नव्हते. .....

                          ●●●

"आपल  काही  मागे राहीलं तर नाही ना  ? "

स्मशानातून  बाहेर  पडताना  भटजींनी  त्याला  विचारले.

"नाही "   अस  सांगताच  ते  पूढे निघून  गेले.

त्याला  मात्र  मागे  पहाताना  दिसली  आईची  धडाडणारी चिता. ..........

...."नाही  कस  ? सगळच तर  राहीलयं  मागे. "

आणि  तो  आवेगाने  मागे  फिरला,  सरणार जवळ   पडलेली  चिमूटभर  राख  त्याने  हातात  घेतली. ...

त्याला  मागे  फिरलेला पाहून  एका ने विचारले
, "
काही राहीलं होत का मागे  ? "

भरल्या  डोळ्यांनी  तो  म्हणाला

" नाही,  काही ,-काही  राहील  नाही  मागे  "

"आणि  जे  राहीलं  आहे  ते  आता  कधी. . कधीच  परत येणार नाही ".......काही  उरलच नाही  , सोबत  घेण्यासारखे...........

.....

14 comments:

  1. योगेश सर
    आपण हे सर्व पुस्तक रूपाने प्रसिद्ध करावे।
    लेखन खूप चांगले आहे।
    आपला सार्थ अभिमान आहे।
    शुभेच्छा।

    ReplyDelete
  2. हृदयस्पर्शी !!!!!!

    ReplyDelete
  3. हृदयस्पर्शी !!!!!!

    ReplyDelete
  4. योगेश अप्रतिम! लिहीत रहा सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर! एखाद पुस्तकही लिहायला हरकत नाही.मला खात्री आहे निश्चित चांगले होईल! आगे बढो!

    ReplyDelete
  5. Yogesh khup chhan lihitos. Pustak kadhayche manavar ghe.

    ReplyDelete
  6. Yogesh khup chhan lihitos. Pustak kadhayche manavar ghe.

    ReplyDelete
  7. सर्वाना मनापासून धन्यवाद
    आपण वाचता अभिप्राय देता खूप छान वाटत



    ReplyDelete

  8. संदर्भ ..
    कल्पना विस्तार लेख सोनचाफायाची फूले
    सौ.धनश्री लेले
    कविता शंकर वैद्य

    ReplyDelete
  9. खुप छान वाचताना न कळत माहेरच्या अंगणात जावुन आले

    ReplyDelete
  10. जोशी सर जबरदस्त

    ReplyDelete