Monday, 22 February 2016

मित्र आणि त्यांचे मैत्र..मैत्री दिनाच्या शुभेच्छा

चिंतनिका जीवन एक " संघर्ष " 🌹
          योगेश जोशी
       वज्रेश्वरी / ठाणे

    👫      "फ्रेंड "
         उर्फ  मित्र /मैत्रीण

मातृभाषेचा  अभिमान  असला  तरीही  मला हा आंग्ल भाषेतील  "फ्रेंड "हा शब्द  जवळचा  वाटतो .
मातृभाषेतून  हा  शब्दप्रयोग लिंगभेद  स्पष्ट  करतो. ..
फ्रेंड मधे  तसं  काही  नाही. ..
यात मित्र  मैत्रीण सगळे आले.
कारण  पूरूषाची ' मैत्रीण ' व स्त्री  चा  ' मित्र ' म्हटलं  की  सो काॅल्ड सोफीस्टीकेटेड पण  बूरसटले मन  असलेल्या  नर - माद्यांची एकच  भूवई  वर  जाते .

तूमचे मित्र तूमची  खरी  ओळख  जगाला पोहचवत असतात, मित्रांवरून  तूमचं  'मूल्य ' ठरत  असत  त्या  मूळे  ही  निवड  काळजी  पूर्वक  असावी .

मित्र श्रीमंत जरूर असावेत  पण ज्ञानाने, वृत्तीने, आचरणाने,बुद्धीमान आणि  अनूभव  संपन्न  असावेत. त्यांच्या  मनाचा  तळ  खोल  परंतू  स्वच्छ  असला  की  मग  भीती वाटत  नाही.

त्यांच्या चातुर्याने , बुद्धीकौशल्याने  किंवा  कधी  कधी  अगदी  साध्या भोळ्या सहज  केलेल्या  कौतूकाने तूमच्या  मनाला, गूणांना नवी  उभारी  मिळावी आणि  तूम्हाला  काय  जिंकायचय,  कशासाठी  जगायचे  याचा  शोध  आणि  बोध त्याच्याकडून  मिळावा.

ऊनाडक्या करणाऱ्या मित्राला परीक्षेच्या वेळी  पेपर  दाखवणे  म्हणजे  खरी मैत्री  नव्हे. .....

'दोस्ती चा वास्ता ' देत  `एकच  प्याला`  हातात  देवून  सूधाकराचा तळीराम करणारी  खरी  मैत्री  नव्हे.

डिस्कोथेक  मध्ये  सोबत  नाचलीस तरच खरी  मैत्री  समजेन अस म्हणणारी मैत्री खरी कदापि  नव्हेच.

मैत्री  निस्वार्थ, निस्सीम असून  मती व नीती ने गतीमान  असावी. 
मित्र  उंच  असावेत पण  त्यांच्या  सावलीत आपण  खूजे वाटलो तरी शितलतेमूळे त्याची खंत नसावी .

लक्ष्य कोठवर गाठायचे आहे , त्याकरीता कोणते  सोपान  वापरायचे आहेत, हे सारं सारं  मित्राने स्पष्ट करावे. ..पैसा,पद, प्रतिष्ठा, लोभ, स्वार्थ न बाळगता. ..

वेळप्रसंगी 'चूकतोस तू 'अशी  कानउघडणी  करून  स्तूतीभाटांच्या भाऊगर्दीत मित्राने राहू नये.
परस्परांवरील स्वच्छ टिका दोघांनीही  मान्य  करावी. पण टीका  करताना  चूकांवर बोट  ठेवण्याचे नेमके मर्म  त्यानेच जाणावे.

लहानशा चूकीने सुंदर नाते मातीमोल करू नये.
अतिपरीचयात जवळ येताना दूराव्याच्या काही  नियम  पाळले  नाहीत तर गोंधळ होईल पण पून्हा योग्य वेळेत  जवळ आल्याने जगणे सूसह्यही होईल.

मैत्री च्या नात्याचे मूल्यमापन करण्याच्या भानगडीत न  पडता आपल्या आयूष्याचा ताळेबंद काहीही न लपवता  परिक्षणासाठी त्याला सादर असावा. ..त्यालाच  ठरवू  दे  तूमचा सच्चेपणा,  निखळता. ....

दांभिकतेने भरलेल्या या जगात  सच्चेपणाचा अंश खर्या  खूर्या मैत्रीत सापडतो. अशी मैत्री होण्याला पूण्याई  लागते. ..

कृष्ण-अर्जून,  कृष्ण- सूदामा  

या परंपरेतील " मित्र " व राधा- कृष्ण  परंपरेतील " मैत्रीण"  लाभणे  हा एक  अपूर्व  योग  आहे.

म्हणून  रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात  फ्रेंड साठी  वेळ  काढा. ...बोला,  हसा  ,रडा, भांडा ,.

.......कारण  हा  दोघांचा  हक्कच  नाही तर  गरजही  आहे. .....

आणि ' मैत्री'  च्या  नात्याला  कोणत्याही  नात्याचे ' लेबल'  लावू  नका. ............

      'नात्यास  नाव  अपूल्या '
          देवू  नकोस  काही ,
        सा-याच  चांदण्याची
         जगतास  जाण  नाही .!

जेव्हा सारे  काही  संपल्यासारखे वाटत  होते  अशा अगतिक व अवघड  काट्यांच्या  पायवाटेवर  जिने शब्दांची  आश्वासक मखमल  पसरवून नवी  उर्मी  दिली.........   त्या  मैत्रिणीस अर्पण. ........  friend  forever. ..✍

🌈  माझी लेखनयात्रा
         योगेश जोशी

5 comments:

  1. खुप छान !! ही मेजवानी नियमित मिळत जावी .

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अलंकारजी
      नक्कीच प्रयत्न करेन

      Delete
  2. खुप छान !! ही मेजवानी नियमित मिळत जावी .

    ReplyDelete
  3. खूप छान!वाचताना खूप मजा आली.'सुसंगती सदा घडो!'उदाहरणे अगदी समर्पक.वा!योगेश ,एखाद्या ज्येष्ठ विचारवंतांचा लेख वाचतेय असे वाटले.फोटो ही मस्त !

    ReplyDelete
  4. खूप छान!वाचताना खूप मजा आली.'सुसंगती सदा घडो!'उदाहरणे अगदी समर्पक.वा!योगेश ,एखाद्या ज्येष्ठ विचारवंतांचा लेख वाचतेय असे वाटले.फोटो ही मस्त !

    ReplyDelete