Friday 21 October 2016

भारत कधी कधीच माझा देश आहे

माझी  लेखनयात्रा
.       *जीवन एक संघर्ष*

* *वाचा  विचार करा पण  थांबू  नका* *

सध्या  चर्चा  सूरू  आहे  ती  पाकिस्तानी सिनेकलावंताचा सहभाग  असलेल्या  चित्रपटाच्या प्रदर्शन विषयी ,

त्यासाठी  सरकारी संरक्षणाविषयी,

बघावा  की  बघू  नये  या विषयी.

बाॅलिवूडचा कळवळा  असणारे  व  स्वताला  ऊच्चविद्याविभूषित  म्हणवणारे  नतद्रष्ट  असे  म्हणतात   की  कला ही  कला असते  तिला  धर्म , प्रांत या बंधनात  अडकवता कामा नये.
दोन  देशातील  वैर खेळाडू  तसेच कलाकारांमध्ये कशाला ???
कलेशी ,कलाकारांशी  आपले  वैर कशाला. ....???  वैगरे .वैगरे

*हे सगळं ऐकल की तळपायाची आग मस्तकात जाते*

मग  दोन  देशांतील  वैर  नेमके  असत  कोणात  हो  ?

त्या सीमेवर  हाड  गोठवणार्या  थंडीत  कूडकूडणार्रा  सैनिकांमध्ये
असते की  अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत  दूर्गम भागात  छातीचा  कोट  करून  ऊभ्या असलेल्या  जवानांमध्ये  असते 
की  घरदार  मूलंबाळ,  संसार , लांब  सोडून  जीवावर उदार  होऊन  सीमेवर  डोळ्यात तेल  घालून  गस्त  घालत  पहारा  देणार्‍या  सैनिकांमध्ये असते का वैर ?

*त्या  पाकिस्तानी  सैनिकाबरोबर कशाला भारतीय  जवानाने   वैर  घ्यायचे ? त्यानी ऐकमेकांचे वैयक्तिक अस काय वाईट  केल  आहे ?

अरे अकलेच्या  खंदकांनो आमचा  सैनिक त्याच्या  रक्ताने माझ्या देशाच्या सीमा आखतो  म्हणूनच  तूमच्या सारखे कृतघ्न  कलाकार  उघडे नागडे नाचून कोट्यधीश होऊ शकतात ... बेताल  बोलू  शकतात.... 
ईथलेच खाऊन  ईथेच  गरळ  ओकू  शकतात ... .

पण बाॅलिवूड सम्राटांनो हा दोष  तूमचा नाही आम्हीच  षंढ  झालो  आहोत

आमची देशभक्ती फक्तं 15 ऑगस्ट ला तिरंग्याचा डीपी  आणि  ऊरी सारख्या  हल्यानंतर "भावपूर्ण  श्रध्दांजलि "अमर  रहे "किंवा  आंख   मे  भर  लो पानी या  रिंगटोन मर्यादेपूरती दिखावू बेगडी  असते  .

*कारण कधी कधीच भारत माझा देश  असतो*  .

👉पण आता  मात्र या वेळी  हा समज  खोटा  ठरवायचा  आहे

🇧🇴बांधवांनो ऊरीतील शहीदांचा बदला  तर  आपल्या  सैनिकांनी घेतला  आहे 

आता आपली म्हणजे  सामान्य  भारतीय🇧🇴  नागरिकाची  वेळ  आली आहे बदला घ्यायची

आपल्या कृतीतून दाखवून  देवू  आपल्या  सैनिकांना  तूम्ही  एकटेच  लढत  नाहीत तर  आम्हीही  आहोत  सोबतीला .🇧🇴

ईतका  कडक  बहीष्कार घालूया  यांच्या  चित्रपटावर  की  डोयरकीपर पण  म्हणायला  हवेत  की  नोकरी  गेली  तरी  चालेल  पण  मी सूद्धा चित्रपटगृहात आत  जाणार नाही
हीच  खर्या अर्थाने  ऊरीतील  हूतात्मा जवानांना सूजाण सूज्ञ  व  कर्तव्यदक्ष नागरीकांकडून खरी  श्रद्धांजली  ठरेल 💐

आणि  तरीही कोणी  जर  चित्रपट  पहायला गेला तर तो  **  *** ** ***  

संस्कार व पेशा या मूळे मला फूल्या फूल्या लिहायला भाग पडते आहे
  पण सूज्ञ वाचक  त्या अचूक  भरतील  ही खात्री

जय हिंद 🇧🇴
वंदे मातरम

योगेश जोशी
वज्रेश्वरी /ठाणे

*टिप* :कृपया जास्तीत जास्त  शेअर  करा.. नावाशिवाय   शेअर   केल  तरीही  चालेल देशभक्तीला काॅपीराइट  नाही
कोणी हिंदीत  अनूवाद केला  तरी चालेल  जास्तीत जास्त  जणांपर्यत शेअर  करा
आणि  हो कोणत्याही  गरीब  कलाकार  किंवा तंत्रज्ञ यांचे  पैसे या चित्रपटात  अडकलेले  नाहीत
  आता फक्त  आपल्या भारतीयांच्या जीवावर मोठे झालेल्या  चार  दोन गर्विष्ठ  धनाढ्यांचा नफा  अडकलेला  आहे

Saturday 25 June 2016

तूम्ही कोण ??? कूंभार,शिल्पकार, की माळी

Iचिंतनिका जीवन एक " संघर्ष "

तूम्ही  कोण ?? कूंभार, शिल्पकार, की माळी  !!

  शैक्षणिक वर्ष सुरू  झाले  आणि  पून्हा  शाळा  शिक्षण  प्रक्रिया  हे  शब्द  ऐकू  येवू  लागले . शाळेत  जाऊन  शिकणे..  किंवा  शाळेत  शिकवले  जाणे .. वा  मी शिकवतो. ...अस  ऐकल  की  शिक्षण  , शिकणे,  शिकवणे ही नक्की  काय  प्रक्रिया  आहे ? हे  कोड  पडत.
मूल  शिकत  कस  ?
त्याला  शिकवलं  जात  म्हणजे  नेमक  काय  ?
हे प्रश्न  ऊभे ठाकतात.

एक सर्वमूखी असलेली  समजूत  म्हणजे  " लहान  मूल  म्हणजे  ओला  मातीचा  गोळा  , जसा आकार  द्याल  तसे  घडेल. "
  या ठीकाणी  शिक्षक /पालक  हा कूंभाराच्या भूमिकेत  दिसतो .

तर  शिक्षक  हा  शिल्पकार  असतो असही  म्हटल  जात.  दगडात  मूर्ती  असतेच  शिल्पकार  फक्तं  त्याला  नको  असलेला  भाग  छिन्नीने काढून  टाकतो व  हवे  असलेले  शिल्प  बाहेर  येते.

असे निरनिराळे  सिध्दांत  ऐकले  की  गोंधळ  होतो  समाधान  होत  नाही.

खरच  शिक्षक /पालक हा   कूंभार  किंवा  शिल्पकार  असू  शकतो.  नक्कीच  तस  नसावं.  कारण  चैतन्याने  भरलेले  मूल  म्हणजे  एकसारखी  माती वा निर्जीव  पाषाण  थोडेच  आहेत  ???
तस  असत  तर  कूंभार / शिल्पकाराप्रमाणे आपल्याला  हवी  तशी  साचेबद्ध  मूल  घडवू शकलो  असतो आणि तशी घडलीही असती .

क्रिडागूरू रमाकांत  आचरेकरांनी सचिन तेंडुलकर  सारखी  अनेक शिल्प  /मडकी  तयार  केली  असती .
याप्रमाणे  अनेक  अब्दुल  कलाम , अनेक  लता,अनेक  न्यूटन  ,अनेक  होमी भाभा    अशी  फक्तं  आणि  फक्तं  हिमालयाची  अनेक शिखरचं तयार  करता आली असती.

कोणतेही  पोषक  वातावरण ,  क्रिडा पाश्वभूमी  नसतानाही " सूनिल " विक्रमादित्य  सूनिल  गावस्कर  होतो  परंतू  जन्मापासून  सर्व  पंचतारांकित  सोयी  ,सूविधा ,कोचिंग,  मार्गदर्शन  ऊपलब्ध  असतानाही  "रोहन " त्या  क्षेत्रात " रोहन  गावसकर  " बनू  शकला  नाही.
आणि मग शिकणं- शिकवणं म्हणजे  नक्की काय  हे  समजून  घेण्याची  ऊत्सूकता  वाढते .

अशावेळी  वीस  वर्षापूर्वीचा एक  प्रसंग  आठवला. आमच्या  वज्रेश्वरी  गावातील  मारूती  मंदिरात   एक  ऐंशी -पंच्याऐंशी वर्षाचे  ऋषितुल्य  संन्यासी  व्यक्तीमत्व  रहात होते. मराठी, इंग्रजी व संस्कृत  वर  ऊत्तम  प्रभुत्व असलेले व वेदशास्त्र पारंगत आणि  दिव्य  स्मरणशक्ती  असलेले  पूरूष,  वेदमूर्ती विठ्ठलपंत  कूलकर्णी  (बाबा ) या नावाने सर्वाना  गूरूस्थानी होते.
मंदिरात त्यांनी मला  विचारले "योगेश काय  चाललय  सध्या  ?"
"शिक्षक  म्हणुन  रूजू  झालोय. .मूलांना  शिकतोय. ..मी ऊत्तरलो
पांढर्या  शूभ्र  लांब  दाढीवरून हात  फिरवत  हसत  हसत  बाबा  म्हणाले  ,  "तू  शिकवत  नाही  रे  त्यांना  , फक्तं  शिकायला  मदत  करतोस. "
माझ्या  कपाळावरील  प्रश्नचिन्ह  पाहून  बाबांनी  मला ऊदाहरणादाखल" शांतिमंत्र " अर्थासहित  स्पष्ट  केला.
यजुर्वेदाच्या शेवटचा अध्याय महत्वाचे  उपनिषद
" ईशावास्योपनिषधाचा " आहे . या  उपनिषेदाचा प्रारंभ  व  शेवट  याच  शांतिमंत्राने  झाली  आहे.

.           ॐ पूर्णमदः पूर्ण मिदं
              पूर्णात पूर्णमुदच्यते ।
               पूर्णस्य  पूर्णमादाय
               पूर्णवेवावशिष्यते ।
        ॐ शांति : शांति  :शांति : ॐ

                      याचा  अर्थ 
        ब्रह्म  पूर्ण  आहे , ते  पूर्ण  आहे
     हे  पूर्ण  आहे , पूर्णातून पूर्ण  निष्पन्न  होते,
    पूर्णातून पूर्ण  काढून  घेतले  वजा  केले  तरी 
               पूर्णच  बाकी  राहते.

या  विश्वातील ,  ब्रह्मांडातील  प्रत्येक  जीव  जंतू  पूर्ण  आहे. किती मोठा व  गहन  अर्थ  सांगितला  आहे  यात.

अहो  एखाद  लहानसं  " बी  " च  उदाहरण  घ्या.     
' बी"लहानसं जरी असल तरी ते अपूर्ण असतं का हो?   
नक्कीच नाही.... 
तर त्यात संपूर्ण झाडाचे गूण संपृक्तपणे ठासून भरलेले  असतात. एवढ्याशा " बी " मध्ये संपूर्ण मोठे झाड  लपलेले असते.  फक्‍त ते झाडाचे सारे गूण प्रकट  होण्यासाठी कुशल माळी किंवा शेतकरी मदत करत असतो  ईतकचं !

कवी  विल्यम्स  वर्डसवर्थ म्हणतो  "Child  is  father  of  man  ."

लहान  अर्भकातच संपूर्ण  माणूस दडलेला  असतो .आणि  ईथे  आम्हा  आईबापाला  अहंकार होतो 'आम्ही  मूलाला  वाढवले  शिक्षकांना  वाटत ' आम्हीच शिकवले  शहाणे  केले  !'

'अरे  आपण  काय  वाढवणार  व  शिकवणार  !'
त्याची  भविष्यातील  वाढ,  शहाणपणा जन्मजात त्याच्यात  संपृक्त  करून ठेवलेला  असतो.  आपण  फक्त  मददगार व्हायचे.
बी  ऊत्तम  रूजून परिपूर्ण  झाड  होण्यासाठी  आवश्यक  माती ,पाणी,  हवा  पूरवणारा कूशल माळी  व्हायचे  !!
माळी  कितीही  हूशार  , कूशल  असला  तरी  तो  आंब्याच्या  झाडाला अंजीर  नाही  उगवू  शकणार . पण  त्या आम्रवृक्षाची  ऊत्तम  निकोप  वाढ  होऊन  त्याला  दर्जेदार  आम्रबहर कसा  येईल  ! ही  व्यवस्था  मात्र  नक्कीच  करू  शकतो  !!

रसायन  शास्त्राच्या भाषेत  सांगायचं तर आपण  ऊत्पेरक ( Catalyst  )  भूमिकेत असावं .

आणि  एकदा  का  हे  समजल  की  मग  लाखो  रूपये  घेवून  मेडीकल  entrance, NEET,  CET, JEE  आय.आय.टी  यन्स जन्माला  घालू  असे सांगणारी  कोचिंगच्या दूकानदारीला थोडा  बहूत  तरी पायबंद  बसेल. ...
मग कोण  होताय तूम्ही  ?? कूंभार, शिल्पकार  की  माळी

Choice  is  yours, will  change  the  future

माझी  लेखनयात्रा
योगेश जोशी
वज्रेश्वरी / ठाणे

 संपर्क 9967766451

What's App वर प्रतिसाद जरूर कळवा 

टिप  ::वरील  मते  व्यक्तिगत असून  मतमतांतरे  असू  शकतात  त्या  सर्वांचे  स्वागत  व  आदर  राखून

Monday 30 May 2016

काय भूललासी वरलीया रंगा

काल  परवा  अचानक  पणे     what's app वर  एक  विनोद  वाचनात  आला......नंतर अनेक  ग्रूपवर  आला म्हणजे  viral   झाला होता .

भाऊ  कदम  मूलगी  पहायला  जातो  मूलगी  काळी  असते  तर  मूली चा बाप  कार  द्यायला  तयार  होतो
त्यावर  मूलगा  म्हणतो  तूमच ठीक  आहे  पण  आमच्या  पूढील  पिढीत  मूलगी  खपवायला  आम्हाला  हेलिकॉप्टर  द्यावे  लागेल  त्याचे  काय  ?

साधारण  अशा  आशयाचा  हा विनोद..
खर  तर  विनोद  हा विनोद  म्हणूनच  घ्यावा  हे  माहीती  असूनही  माझ्या  सारख्या  विनोदी  माणसालाही यावर  हसू आले नाही .
कूठेतरी  हा विनोद मन  विषण्ण  करून  गेला.

गोरा  ईंग्रज जाऊन  काही  तप  गेली  तरी  गोर्‍या  रंगाची  गूलामी मात्र  आमच्या  मानगुटीवरून  काही केल्या ऊतरायला तयार  नाही.

  गोरेपणाची  गूलामगिरी कूठेतरी  खोलवर घट्ट  रूजली गेली  ।

याची  सूरूवातच  जन्माअगोदर पासून  सूरू होते.
अमूक  तमूक  खा  ग   बाई   ... दूध केशर  घे  ...बाळ  कस  गोरगोमट  होईल  हं. ...

खरं तर  मूलगाच हवा..... पण  मूलगी  झाली तर  मात्र  सूंदर  गोरीपानच  हवी  हो  !

पाळण्यात  असताना  कमेंट  आल्या " व्वा !!  काय  छान  गोरीपान  आहे हो मूलगी. """..

बालपणी  गाणं  कानावर  आले  गोरी गोरी  पान  फूलासारखी छान  दादा मला एक  वहीनी  आण. ..

तारूण्यात  कानावर  शब्द  आले  चांदी  जैसा रंग  है  तेरा ....सोने  जैसे बाल......

मी गोरी आहे म्हणजे नक्की  काय  आहे  ???

याच  ऊत्तर  मोठी  होत  गेले  आणि  कळत  गेल ...

समजायला लागली मला माझ्या गोरेपणाची किंमत...

रंग देहावरून फिरणाऱ्या ऊत्सूक नजरा. ..
सलगीसाठी धडपडणाऱ्या.....
प्रेमात पडणारी, ......मागे लागणारी पोरं....
घरचे,
बाहेरचे,
नातलग,
शिक्षक
सगळ्यांच्याच नजरेत  ' माझ्या ' आधी  दिसणारा माझा 'गोरेपणा'
सगळ्यात  आधी  अधोरेखित  होणारा

मी गोरी आहे म्हणजे काय आहे?

मैत्रिणी म्हणतात,

"तुला नाही कळणार काळेपणाची दुःखं !!!!

"टीव्हीवर दिसणाऱ्या गोऱ्या रंगासाठी  होणार्या  हजारो  कोटींच्या  ऊलाढालीच्या   बाजाराला.....क्रीम  ऊपाय  जाहीरातीःना  ठेवू नकोस नावं.....

दररोज  नवीन  अॅडव्हान्स फार्मूला  सह  काही दिवसापासून  ते  आठवड्यात   गोरेपणाची  हमी  देणारी हमखास  ऊत्पादने....
आमच्यासाठी  वेड्या आशेचा   किरण  असतात ग. . ......त्यात  घरगुती  नूस्के ...नो  साईड  ईफेक्ट  वाला आयूर्वेद  ही  मागे  कसा राहील ...

गोरेपणाला कधीच  नसत  दूःख.....
नसतो  कसला  त्रास ...
या  ऊलट
"अग लग्नाच्या बाजारात  सगल्यात जास्त  तूझाच भाव..""

खरच .....

मी गोरी आहे म्हणजे काय  ?????

माझ्या रक्ता मांसावर चढलेली एक त्वचा.....
फक्त  त्वचा ....
आई बाबां कडून वाहून आलेले जीन्स.....
या उपर माझं कर्तृत्व काय ?......
शून्य. ..

पण तसही ते  कतृत्व बघायचे आहे कुणाला    ???

माझी कातडीच सगळ सांगते....

का   ???
ईतर  रंगाच्या  त्वचेखाली... भावना , प्रेम , ओढ , काम भावना' शृंगार. ..  गूणवत्ता, कर्तृत्व  काही नसेल.??.  की कमी असेल. ..??.

पण  याचा विचार  कोणाला करायचाय. ..

मग मी गोरी आहे म्हणजे नेमकं काय आहे??

कुणास ठाऊक??

मी नक्की कोण आहे?

गोरी बाई,
काळी बाई,
सावळी बाई
की नुसती बाई  
हो  हो  नूसती  बाई ....

माणुस नाही ...आधी बाई...

माझ्या कातडीच्या रंगा वरुन...
त्यांना,
ह्यांना,
ह्याला,
त्याला
सगळ्यांनाच्
काहीतरी म्हणायच असत ...सतत..

तू गोरी ना म्हणून...
तू काळी ना म्हणून...
तू सावळी ना म्हणून...

मग होते हळूहळू सवय या 'म्हणून' ची

आणि तिला ही चढतो कैफ तिच्या रंगाचा
केव्हा मग होते ती दुःखी तिच्याच रंगामुळे..

कोणी विचारतं का तुझा बाप, भाऊ, नवरा, मित्र, प्रियकर
यांच्या कातडीचा रंग कसा आहे...

छे ! !  छे ! ! काहीतरीच  काय ?
आजिबात अस  काही विचारायचं नसतं...
कारण या मातीसाठी
पुरुष कर्तृत्व असतो आणि स्त्री फक्त  भोग...

काळा  फळा ..........हवा
काळा  पैसा. ..........हवा
काळी  माती........... हवी
काळे  ढग ............. हवेत
काळी  तिट............. हवी
काळे  डोळे ............  हवे
काळा  विठ्ठल ......  हवा
काळा  कृष्ण  .........हवा
पण ...........
पण  ........पण
राधा  मात्र  गोरीच हवी ........
तेच  तिचे कर्तृत्व. .......
तीच  गूणवत्ता. ........

किती करकचुन बांधून टाकले आहे
आपण आपल्यालाच...

मग सौंदर्य दिसत नाही....
आनंद दिसत नाही, ...
कर्तृत्व दिसत नाही....
दिसतो फक्त रंग.....

काळा...सावळा...
नाहीतर गोराही !!

शिवाय नोकारीतही म्हणे तुम्हाला
मिळते विशेष वागणूक..
तुला हवीये की नकोय हा मुद्दाच नाहिये...

पुरुषांना ही हव्या असतात गोर्‍या बायका
का तर वंश पुढे निघेल गोरा  !!

खरच  जर  फक्तं  गोरेपणात सौंदर्य  असत  तर  प्राचीन  मंदिरावरील  कमनीय  सौदर्यवतींची शिल्पे फक्त  संगमरवरी  दगडात असती  पण  ती  कोरली  गेली काळ्याशार  गंडकी पाषाणात. ..आजही मन  मोहीत करतात. ....

मग  जिवंतपणी  ही  फक्त  गोरेपणाची  अपेक्षा  व  सावळयाची उपेक्षा  ही  कसली मानसिक  गूलामगिरी की विकृती. ...

आफ्रिकन  आमच्या ईथे  येतो तेव्हा  तो निग्रो  असतो या ऊलट  एखादा  भिकार गोर्‍या  कातडीचा  जरी आला तर  तो  परदेशी  नागरीक   (foreiner ) ठरतो  ही कोणती  बौद्धिक  दिवाळखोरी .

आणि  संत  चोखामेळा सहज  आमचे कान  टोचून  जातात

ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा | काय भुललासी वरलिया रंगा || १ ||

कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा | काय भुललासी वरलिया रंगा || २ ||

नदी डोंगी परी जल नोहे डोंगा | काय भुललासी वरलिया रंगा || ३ ||

चोख डोंगी परी भाव नोहे डोंगा | काय भुललासी वरलिया रंगा || ४ ||

संदर्भ

डोंगा  - वेडा वाकडा  / वळणदार
कमान - धन्यूष्य
तीर  - बाण


🌈माझी लेखनयात्रा

Saturday 2 April 2016

"एका शेवटाची सुरूवात "

चिंतनिका जीवन एक " संघर्ष " 🌹

मूलींचा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करून परत येताना रस्त्यात आंब्याचे झाड दिसले.
" बाबा कैरी हवी " या बालहट्टात सामील होऊन दगड भिरकावून कैर्‍या पाडल्या व  "वज्रेश्वरी" गावातील  माझ्या खोडकर दिवसांची आठवण झाली.

"बाबा  ह्या झाडाला आपण कधी पाणी दिले नाही की याची निगा घेतली  नाही  की  काळजी घेतली नाही; या ऊलट दगड मारून दूखवलेच त्याला; तरीही त्याने न रागावता आपल्याला कैर्‍या दिल्या."
"मग ज्या ' मनूष्यप्राण्याने ' आपल्या मूलाबाळांवर प्रेम केले त्यांच्या साठी "आयूष्य "वेचले त्यांच्या वाट्याला 'वृद्धाश्रम' का हो ? "

तिच्या प्रश्नातच  मला  ऊत्तर दिसले. "मनूष्य" फार कमी काळ "मनूष्या"सारखा वागतो, आणि  जास्त वेळ " प्राण्या"सारखाच असतो  !  पंखात व पंजात बळ  येण्या पूरतीच प्राण्यांमधे कुटुंब  व्यवस्था  असते.  म्हणूनच  "मनूष्यप्राणी"  हेच  संबोधन  सूचक  होते .

"बस झालं  रे  परमेश्वरा,  ने  आता  !"
"नाही  सोसवत रे आता !! बोलव  रे,  लवकर !!"

अशा अर्थाची  वाक्य दिवसात कोणाच्या ना कोणाच्या तोंडून आपल्या कानी पडतात. तरीही हा क्षणिक वैताग, त्रास, बाजूला ठेवून प्रत्येक जण जगत असतो. ....तेव्हा नेमक्या कोणत्या गोष्टी जगण्यास प्रवृत्त करतात. ? ? ?

कर्तव्य,  जबाबदारी,  स्वप्न, नातीगोती, कुटुंब, प्रेम या  प्रयोजनांचे स्वरूप  आयूष्याच्या  वेगवेगळ्या  टप्प्यांवर  बदलत  जाते.

पण  आयूष्याच्या  संध्याकाळी  तीव्र  जीवनेच्छेचे  ठोस  कारण नसले  तर  ही  संध्याकाळ फारच  तप्त  होते  , जीवाची  काहीली  करते .

आपण  निरूपयोगी ; कुटुंबावर  भार ; घरात  अडचण  म्हणून  तर  राहणार  नाही  ना  ???
हा  विचार  अस्वस्थ  करतो.

"गात्र" शिथिल  होत  जातात  अन  "त्रागा" वाढत  जातो  .

'आम'च्या  वेळी  असं नव्हतं  !!
'आम'च्या ईथे  नव्हते  हो  चालत  असलं !
'आम'च्या  कुटुंबात  नाही हो  ह्या  पद्धती  !
'आम'च्यात  नाही असे  काही  !!

हा " आमवात  " बळावत  जातो  व जनरेशन  गॅप  ची  " रूजवात " होते.

तारूण्याच्या ऐन  उमेदीत  ज्या  स्वप्नांच्या मागे  जीवाचे  रान  केले, करियर  च्या  मागे बेदरकारपणे  बेफाम  होऊन  धावताना प्रसंगी  मूल्यसंस्कार तूडवले गेले त्या  स्वप्नांचे  मोल आता  कवडीमोल   झालेले  पाहून  आता विषाद,  खेद,  खंत  ,उपेक्षा  याखेरीज  हाती काही लागत नाही.
नको  नको  म्हणत  टाळताना  नकळतपणे  समोर  ऊभा  ठाकलेला  " वानप्रस्थाश्रम " मानसिक, भावनिक, शारीरिक, व आर्थिक  रिकामपण  घेवून  येतो.
कर्तव्य , लोकलज्जा, प्रापर्टी   किंवा  प्रेमापोटी  काही  जण  जेष्ठांची जबाबदारी  घेतातही पण  ती  जबाबदारी  नूसतीच घेवून  चालत  नाही  ती  निभावणं  ही  गरजेचे  असते.

कृपया  जेष्ठांच्या मदतीची  याचना  करण्याची  वाट  पाहू  नका , त्यात  त्यांना  मेल्याहून मेल्यासारखे होईल. ....न मागता........हात  न  पसरताही त्यांचा  हात  हाती  घ्या. पैशाची  नव्हे  तर  सहवासाची  , सहप्रवासाची  मदत  करा. ऊत्तम  श्रोता  व्हा  ! ! त्यांना  बोलण्याची  संधी  द्या. जगण्यात  जीवन  येईल त्यांच्या.

हे  करत  असताना  एक  महत्त्वाची  गोष्ट  करा ते  म्हणजे  आज  तूम्हाला  वयोवृद्धा  कडून  जी  अपेक्षा  आहे, त्यांच्या  ज्या  गोष्टीचा  त्रास  होतोस  ,ज्या  गोष्टीची  अडचण  होतेय  अस  वाटत. ..ती  मात्र  लक्षात ठेवा. ......कारण  तूम्हीही  वानप्रस्थाश्रमात
जाणार  आहात  निदान  पूढील  गृहस्थाश्रमींना  तरी  फायदा  होऊल त्याचा .
कारण  अंतिम  आनंदयात्रेनंतर जर  ,"बर  झालं  सूटले एकदाचे, "हे  हळहळणारे शब्द  जगलेल्या  आयूष्याचा  पराभव  करतात.

"काय  हे  बाबा,  किती कठीण  लिहिले आहे , मला कळेल  असे सोपे  सांगा  ना  जरा "

माझ्या  सातवीत  असणार्‍या  ऋचा ची  तक्रार  वजा  सूचना.

ठीक  तर  एक  गोष्ट  ऐक
आटपाट  नगरात  एक  विचित्र  कायदा  होता  कोणताही  राजा  फक्त  एक  तप  ( बारा  वर्षे ) राज्य  करेल त्या  मूदतीनंतर त्यांची  रवानगी  नगरीच्या  नदीच्या  पल्याड असलेल्या  निर्जन,  भयाण  हिंस्र  श्वापदे  असलेल्या  अरण्यात  केली  जाईल.

मूदत पूर्ण  होताच  आजपर्यंत  प्रत्येक  राजाला  जबरदस्तीने  नावेत  बसून  न्यावे  लागे. ....ते  ओरडायचे  रडायचे  विनवण्या  करायचे  पण  प्रजा  नियमाला  बांधिल होती.

पण  आज  मात्र  विलक्षण  घङत  होते  राज्यकारभाराची  मूदत पूर्ण  करून  राजा योगेंद्र  अतिशय  आनंदात , प्रसन्न चित्ताने,  स्वखुशीने  नावेतून पलिकडे  निघाला  होता. प्रजा  आश्चर्यचकित  होऊन  हा  निरोप  समारंभ  पहात  होती.

नावेच्या  नावाड्यासाठीही  हे  सर्वस्वी  नवीन  होते.
न  राहवून  तो  राजाला  म्हणाला ,

," राजन  आजपर्यंत  तूमच्या  ईतक्या  समाधानाने  राजीखूशीने या  शेवटच्या  प्रवासाला  कोणीच  निघाले  नाही. "
"आपल्या  शांत  असण्याचे  रहस्य  काय  ? ??" "आपणास  त्या  निबिड  , भयाण  जंगलाची  भीती  नाही  का  वाटत  ? "

राजा  उत्तरला, " अजिबात  भीती  नाही  वाटत  मला. गादीवर  बसतानाच मला  माहीत  होते  की  एक  दिवस  मला  त्या  भयाण  अरण्यात  जावेच  लागणार  आहे.

आदर्श राज्यकारभार करताना  मी  एक मात्र  केले  पलिकडच्या  अरण्यावर  पण  लक्ष दिले .माझ्या  कालावधीत  मी  तेथे  नंदनवन  फूलवले .आता त्या  निर्जन  जंगलाची  मला  भीती  नाही  उरली. मी  कृतार्थ  आहे.

कारण  या  "शेवटाची"  मी  कधीच  "सूरूवात"  केली  होती .

  मंडळी आता  तूम्ही  तरूण  आहात,  निवृत्तीच्या अरण्याचा विचारच  काय  स्वप्न ही   कधी  पडत  नसेल . परंतू  हीच  योग्य  वेळ आहे  पलिकडे  आपल्यासाठी  नंदनवन  फूलवून ठेवण्यासाठी.

आजपासून  वानप्रस्थाश्रम  चे  नियोजन  करा

कोणाकडून  अपेक्षा  ठेवाल  तर  अपेक्षाभंगाच्या  दूखाची तयारीही  ठेवा .

महीन्याच्या  मिळकती मधील  एक  हिस्सा  बाजूला  ठेवा. समाजऋण फेडण्यासाठी.

पिढी दर पिढी वेगवान  होत  जाणार्या  आयूष्याच्या  गाडी  बरोबर  Adjust  व्हायला  शिका. किंवा Add  just  करा .

दिलेले काढू नका , केलेले  आठवू  नका.

असे केले  तर  "निवृत्ती " होईल  "प्रवृत्ती " व  ठरेल  "आवृत्ती " नित्य  नव्या  जीवनाची.

तर  मग  आजच  करूया  एका  शेवटाची  सूरूवात
मी  केलीय  तूमचं  काय  ?

योगेश जोशी
वज्रेश्वरी / ठाणे




Tuesday 22 March 2016

"राजगृहातील वनवास "


चिंतनिका जीवन एक " संघर्ष " 🌹

               " राजगृहातील  वनवास  "

"बाबा रामायणातील  लक्ष्मणाच्या  पत्नी  चे  नाव  काय  हो  ?"

माझ्या  मूलगी  ऋचा च्या  या  प्रश्नाने  मी  गोंधळून गेलो .

"अग  ते  आपलं.....
  , हे  ....काय ....
...ते  म्हणजे". ........
.अग ..  ...तोंडावर  आहे........
पण. .येत. .. नाही  ...
"आपल  ...हे..."......." ते ......".

आणि  मला लक्षात  आलं.....
  की  हे  आपल्याला " आठवत "  नाही  किंवा  कधी  "लक्षातच  ठेवलेले  नाही, जाणीवपूर्वक!

राम -सीतेसह चौदा  वर्षे  वनवासात  सावली  बनून  राहणारा  सावत्र भाऊ  "लक्ष्मण " हा " आदर्श  बंधू, " "आदर्श  दीर " , व स्वतःच्या पत्नी  ला  चौदा  वर्षे  राजगृही  वनवासाहूनही खडतर  अशा  पतीवियोगात सोडणारा  म्हणून  "वैराग्याचा  पूतळा "  म्हणून  गौरवला जातो. ..
...
पण  त्याच  वेळी  कोणतीही  चूक  नसताना  चौदा वर्षे  पतीवियोगात  राजगृही  वनवासात  भोगणाऱ्या  त्याच्या  पत्नीची  दखल महर्षी  वाल्मिकी  नी  घेवू  नये. ...

तिच्या  व्याकूळ  मनोअवस्थेचे  , संतापाची  योग्य  ती  दखल.......योग्य ते   वर्णन  ही  करू  नये .......

चौदा वर्षे  पत्नी  पासून  दूर  राहून  जर  लक्ष्मण  वैराग्याची  मूर्ती,  आदर्श  बंधू. ...आणि  राम -सीतेसह  देवत्व  प्राप्त  करत  असेल. .तर
त्याच्या   पत्नी  ला    "त्यागाची  मूर्ती,"  "वैराग्य शिरोमणी ,"वंदनीय, " पूजनीय "म्हणुन  का मान्यता मिळू  नये. ..........का बरं  तिचे साध " नाव " सूद्धा  आम्हाला  पटकन  आठवू  नये. ..

प्रकाश  देणार्या  समईचे कौतुक  होते  पण  स्वतः  ला  जाळून  घेणारी  वात  खिजगणतीतही  नसते........

आपल्या  अवती  भोवती  कदाचित  अशा  वाती  असू  शकतील .......
आई. .पत्नी. .बहीण. ..वहीनी. ..अनेक  रूपात. ......

वाल्मिकी  नी  केलेली  चूक  आपण  का  करायची  ?

त्या  जळणार्या  वातीला फक्त  ईतकच म्हणून  बघा

   " कीती  करतेस  गं  तू  ?
   "थकत  कशी  नाहीस  ?
"लक्षच  देता नाही  आले  तूझ्याकडे !"

मी खात्रीने  सांगतो  असं   म्हटल्यावर
त्या  राजगृही  वनवासाहूनही  खडतर  अशा  दूःखात  कूढणार्या ""ऊर्मिले"" चे  डोळे  पाण्याने  भरून  येतील  व  सारा  वनवास सूफल  संपूर्ण  होईल. .

मग  म्हणणार  ना  आजच  !

🙏चिंतनिका जीवन एक " संघर्ष "    
योगेश जोशी 

9967766451
वज्रेश्वरी / ठाणे 

आवडल्यास  शेअर करा ।

Saturday 12 March 2016

"घे भरारी "


चिंतनिका जीवन एक " संघर्ष " 🌷

गरूडाचा एक  समूह  खाण्याच्या  शोधार्थ  उडत उडत एका  बेटावर  आला  .

ते  बेट  जणू  नंदनवनच होते.
 चहूकडे  खाण्यासाठी  बेडूक ,खेकडे ,मासे, साप,  व  अनेक  समूद्रीजीव होते.

 महत्त्वाचे म्हणजे  आजूबाजूला  त्या  गरूडांवर  हल्ला  करेल  अशा  कोणत्याही  जंगली  श्वापदाचे अस्तित्व  नव्हते.

अगदी  निश्चिंत  मनाने  कशाचीही  भीती  न  बाळगता  ते तेथे  राहू  शकत  होते.

समूहातील  तरूण  गरूड  तर  एकदम  ऊत्साहीत होते.

त्यातील  एक जण  म्हणाला
,"वाह  क्या बात है  !  आता  मी  ईथून कोठेही  जाणार  नाही,  अगदी  बसल्या बसल्या  मेजवानी  आहे  ईथे  ."

ईतर  गरूड  ही  त्याच्या  "हो"  ला  "हो" करत  आनंदात  मशगूल   होते. 

सर्वाचे  छान  आरामात  चालले  असताना  समूहातील  जेष्ठ  गरूड  मात्र  नाराज,व दुखी  होता.

एक  दिवस  त्याने  आपली  चिंता  व्यक्त केली,

"मित्रांनो,  आपण  एक  गरूड  आहोत,  ऊंच  गगन  भरारी घेणे  व अचूकपणे  सावजावर घट्ट  झडप  घालण्यासाठी आपण  ओळखले  जातो.

"" पण  जेव्हा  पासून  आपण  ईथे  आलोय,  गगन  भरारी  सोडाच आपल्या  पैकी  अनेक  जण  साधं  ऊडले सूद्धा  नाहीत  की  पंख  ही  फडफडविलेले  नाहीत.

"आरामदायी  मेजवानी  मूळे  आपण  शिकार  करणेच  विसरून  जाऊ , हे आपल्या  भविष्यासाठी  घातक  आहे. "

"म्हणून  मी हे  बेट  सोडण्याचा  निर्णय  घेत आहे, ज्यांना  माझ्यासोबत  यायचे  आहे  ते  येवू  शकतात. "

त्या  जेष्ठ  गरूडाचे बोलणे  ऐकून सगळे  हसायला  लागले.
कोणी त्याची  गणना  "मूर्खात"  तर  कोणी " वेडा" म्हणून  निर्भत्सना  केली.

बिचार्‍या   एकट्यानेच  ते बेट  सोडून  दूरच्या  जंगलात  जाण्यासाठी  गगन  भरारी  घेतली.

काही  काळ .....  , वर्ष  सरली................  .

तो  गरूड  म्हातारा  झाला .
 त्याला कळाले  की  आपण  फार  दिवसाचे  सोबती नाहीत.
त्याला  मनोमन  आपल्या  साथीदारांची  आठवण  झाली.

  वाटले  चला  एकदा  पाहून  येवू  सार्याना ....आणि  मग  मोठी  भरारी  घेवून  मजल  दरमजल  करत  तो  त्या बेटावर  पोहचला. ..........
....तेथील  दृश्य  फारच  भयानक  होते. ..अकल्पित  होते. .....

बहूतेक  गरूड  मारले  गेले होते. ....
जे  थोडे  वाचले  ते  जखमी  असहाय्य , अगतिकपणे  आर्त  विव्हळत  होते.

" हे काय  झाले  ?  "  जेष्ठ  गरूडाने विचारले

दूखाने विव्हळत  एक  जखमी  गरूड म्हणाला

"आम्हाला  क्षमा करा  !! आम्ही  तूमचा  सल्ला  गंभीरपणे  घेतला  नाही. "

"तूम्ही  गेल्यावर  काही  महीन्यात  या  बेटावर  नाव  घेवुन  काही  माणसे  आली  आणि काही शिकारी  कूत्रे ईथे  सोडून  गेली. "
"सूरूवातीला  कूत्रे  आमच्या  जवळ  आले  नाहीत  पण जेव्हा  त्यांना  समजले  आम्ही  ऊडू ही शकत  नाही  व पंज्याने हल्ला  ही  करू  शकत नाही त्यांनी  आमची  शिकार  करायला  सूरूवात  केली.

जवळपास  सारेच  नष्ट  झालेत..
  जे आमच्या सारखे  राहीलेत  जखमी, अभागी.....  मरणाची  वाट  पहातोय. ..."

  त्या जेष्ठ  गरूडा जवळ  त्यांच्याबद्दल वाईट  वाटण्याखेरीच काहीच  नव्हते ...हळहळत  त्याने   पून्हा  जंगलाकडे  भरारी घेतली.

मित्रांनो  अगदी  असेच  आपल्या  बाबतीतही  घडू  शकते.

जेव्हा  आपण  आपल्या  देणगी  मिळालेल्या  नैसर्गिक  शक्तींचा  ऊपयोग  करत  नाही,   तेव्हा  त्या  गमावून  बसतो.

मग  ती  शक्ती  मनाची  असेल  , मेंदूची  असेल  किंवा  स्नायूंची  असेल  न  वापरल्याने  त्यातील  तेज  ,ओज  कमी  होऊन  निस्तेज  होते.

अशाच  प्रकारे  अंगभूत  असणारी  कौशल्ये, कला  (skill ) यांना  वेळोवेळी  पैलू  पाडले (*polish ) नाहीत  तर  त्याची  क्रियाशक्ती कमी  होते

अतिशय  वेगाने  बदलत  असलेल्या  काळात  आम्ही  आमच्या  नोकरीत  कींवा  करीत  असलेल्या  व्यवसायात  ईतके  सूखासीन ,सूखेनैव, *(comfortable ) असतो  की  मग  कोणताही  नवा बदल  , नवे  ज्ञान,  नवीन  तंत्र , नवे  कौशल्य  आत्मसात  करण्याच्या  भानगडीत  आम्ही  पडत नाही .

आणि  मग  आम्ही  मागे  पडतो  ..........

कधी कधी  बाहेर  फेकले  जातो. .......

आणि  त्याचे खापर  नशीब वर  कींवा  Market Conditions वर  फोडून  रडत  बसतो .

मंडळी .. ..................

HMT घड्याळ,  ............

BUSH  /Crown  TV  ..............

Kelvinetor  Refrigerator ...... .......

Nokia  Handset. .............

HMV  Cassette. .... .....

हे सगळे कशातही गूणवत्तेत कमी नव्हते ........

पण  काळाच्या  जोडीने  बदलले  नाहीत  आणि  मोठी  किंमत  चूकवली ........बाहेर  फेकले गेले. ...

"समय  के  साथ  बदलो , नही तो  समय  आपको  बदल  देगा "
खरच  अस  नको  व्हायला .......

"आपलं ज्ञान, "
 आपल्या  क्षमता, 
आपली  कौशल्ये, 
आपली  तंत्रे  
येणार्या  व बदलत्या  वेळेनुसार  अद्ययावत  करू  या. .....

.त्यांना  धार  आणून  तेजस्वी  करूयात ........
सातत्याने फूकंर मारून  निखार्यावरील  राख  ऊडवून अग्नी  प्रज्वलित  ठेवूया. ...........

यासाठी  "  ना  वयाचे  बंधन  ना  वेळेचे. ..."....

ज्या  साठी  आपण  ओळखले  जात होतो  तीच  ओळख  कायम  ठेवू  या.....  त्या  साठी  प्रयत्नशील  असू  द्या. .

अस  झाल  की  मग  संकटांचा  किंवा  आव्हानांचा  कितीही  मोठा डोंगर  ऊभा  ठाकला  तरी  जिद्दीच्या  पंखांनी  आपण  उंच  उंच  गगन  भरारी नक्कीच  घेवू  शकतो.


             "मंझिल  ऊन्ही को  मिलती  है
            जिनके  सपनो  में  जान  होती है ।
             सिर्फ़  पंखों  से  कूछ  नही  होता
              ऊडान हौसलोंसे  होती  हैं  ।


माझी लेखनयात्रा
योगेश जोशी
वज्रेश्वरी / ठाणे

नम्र विनंती : 
आवडल्यास  हा  ब्लॉग  तूमच्या  किमान  चांगल्या  मित्र/ मैत्रीणी ला  शेअर  करा ।

Friday 4 March 2016

मागे काही राहीलयं का?

चिंतनिका जीवन एक " संघर्ष " 🌹
योगेश जोशी वज्रेश्वरी / ठाणे

        "मागे काही राहीलं तर  नाही  ना   ? "

"अरे  सगळे  सामान  घेतल  का  ?"  "बस  मधे  कोणाच काही  राहील तर  नाही  ना  ?"

"हो .......सर  ,सगळ  घेतल , न  विसरता  !!
सहलीवरून  ऊतरलेली मूल  एकसूरात  ओरडली

"छान , पण  जोशी सर  ,  एकदा  बस  मध्ये  जाऊन  बघता  का   ,"काही मागे राहीलयं  का ते  ? "म्हणजे बस  परत  गेल्यावर  नंतर  धावपळ  नको  !  कस

मूख्याध्यापकांनी सूचना  वजा  विनंती  केली.

"होय  येतो  पाहून,  "
अस  म्हणत  सर  बस  मधे  गेले

एका नजरेत  बस  पाहील्यावर  लक्षात  आलं  सगळ्यांचच  खूप  काही  राहील  आहे  मागे.

वेफर्स ,कूरकूरे,  चाॅकलेट  यांचे  रॅपर्स,  फ्रूटी  , प्लास्टिक  बाॅटल्स.........आता  मात्र  ते  कोणाचच नव्हते  ...

जोपर्यंत  ह्या  भरलेल्या  होत्या  तोपर्यंतच  या  सर्व  " माझ्या " या  सदरात  मोडत  होत्या. .....
आणि  आता  मात्र  कोणाच्याच  नव्हत्या.

.............जमेल  तेव्हढे  एका पिशवीत भरून  सर  खाली  ऊतरले.

"काही  राहील  होत  का  मागे  ?"

या  मूख्याध्यापकांच्या प्रश्नावर   हसत हसत नकारार्थी  मान  हलवत  जमलेल्या  पालकांकडे  गेले.

पण  मन  मात्र  .............

"मागे  काही  राहीलयं  तर  नाही ना  ?"

याच  प्रश्नाभोवती घूटमळत राहीले. ..आयूष्याच्या  प्रत्येक  टप्प्यावर  हा  प्रश्न  निरनिराळ्या  रूपात  समोर  ऊभा ठाकला  ईतके  मोठे  प्रतल या  प्रश्नाचे
 
बालपण  सरताना अनेक  गोष्टी  मागे  राहील्या  काही  खेळ  विकत  घ्यायचे तर  काही  खेळायचे  राहीले. ............

तारूण्याच्या  उंबरठ्यावर  मनापासून  आवडलेल्या व्यक्ती ला अंतरीचे  गूज सांगायचे  राहून  जाते.....

.......व्यवहारी  आयूष्य  पूढेच  सरकत  असल  तरी मन  मात्र  सदैव  मागे  मागे  घूटमळत असत

..आईसोबत  चालणाऱ्या  लहान  बाळा सारखे. .........आई  पूढे  पूढे  जात  असते, पण  तो  रस्तावरील  मांजरीची पिल्ले, रंगीत  काचा,  दगड,  काठ्या  यातच  मागे  मागे  घूटमळत  असतो. ...अगदी  तस्सेच. ....

.                       ● सूचना ●

● पैसे, पाकीट, किल्ली, पास, रूमाल, घेतलात काय?
● लाईट गॅस पंखा नळ बंद केलेत का?
● घाई नको, आपल काही मागे राहीलं तर नाही ना  ?

अशा प्रकारचा  एक बोर्ड  सोसायटीच्या जिन्यात  वाचला.
मनात  सहज  विचार  आला

, "तीन  महीन्याच्या तान्ह्या बाळाला घरात ठेवून कामावर निघालेल्या मातेला हे वाचून काय वाटेल  ?

व्यवहारी जगातील  "सर्व काही " मिळवण्याच्या अट्टाहासापायी काळजातील " सर्व काही "  मागे  ठेवूनच  निघते  ती. ... 
सांगा  कसं  म्हणावं  तिने  "सगळे  घेतलय"  म्हणून. ........

लग्नमंडपात मुली ची पाठवणी  होताना  आईच्या  डोळ्यात  आभाळ  सांडून  ती  रिती  होते.
सगळी  देणी  भागवून  बाप  निवांत  होतो न  होतो  तोच 

एखादी  आत्या  त्याला  म्हणते, "

" दादा हाॅल  सोडायच्या  आधी , एकवार  आत  खोलीत  जाऊन  बघून  ये  बर  ", "काही  मागे राहीलयं का ते?

रिकाम्या  खूर्च्या,  पसरलेल्या  अक्षदा,  ओलांडून  तो  वधूपक्षाच्या  खोलीत  येतो. .......

मूली ने  गौरीहार  पूजला तेथे  आता फक्त फूले  मलूल  पडलेली  दिसतात. ...

.व्याकूळतेने  मनात  म्हणतो  ," सगळच  तर  मागे  राहीलयं." ....... ...

पंचवीस  वर्षे  जे  "नाव " घेवून  ....
...त्या " नावाने " हाका  मारत  तिच्या  मागे  मागे  पळत  होता  , 
ते  तिचे  'नावही '  व  तिच्या " नावापुढे"  ज्या  अभिमानाने   लावत  असलेले  "त्याचे " नावही   

हातावर ऊदक  सोडताच क्षणार्धात  तिथेच  त्या अक्षतापूष्पा  सोबत " निर्माल्य " झालेले  दिसल्याने  एकटाच मनातल्या मनात  भरभरून  कोसळतो. ...........

"अरे  आलास  का पाहून  ? "
आपल  मागे  काही  राहीलं तर नाही ना  ?

............या  प्रश्नाचे मौन  हेच  ऊत्तर  असते.........   निशब्द ......कारण  जे  राहीलं  ते  आता  परत  येणार  नव्हते. .....

                          ●●●

"आपल  काही  मागे राहीलं तर नाही ना  ? "

स्मशानातून  बाहेर  पडताना  भटजींनी  त्याला  विचारले.

"नाही "   अस  सांगताच  ते  पूढे निघून  गेले.

त्याला  मात्र  मागे  पहाताना  दिसली  आईची  धडाडणारी चिता. ..........

...."नाही  कस  ? सगळच तर  राहीलयं  मागे. "

आणि  तो  आवेगाने  मागे  फिरला,  सरणार जवळ   पडलेली  चिमूटभर  राख  त्याने  हातात  घेतली. ...

त्याला  मागे  फिरलेला पाहून  एका ने विचारले
, "
काही राहीलं होत का मागे  ? "

भरल्या  डोळ्यांनी  तो  म्हणाला

" नाही,  काही ,-काही  राहील  नाही  मागे  "

"आणि  जे  राहीलं  आहे  ते  आता  कधी. . कधीच  परत येणार नाही ".......काही  उरलच नाही  , सोबत  घेण्यासारखे...........

.....