Monday 29 February 2016

"ब्रेक तो बनता है "

चिंतनिका जीवन एक " संघर्ष " 🌹 
.            योगेश जोशी
.           वज्रेश्वरी / ठाणे

      " ब्रेक  तो  बनता  है  "

विकेंड  ला  गावी वज्रेश्वरी  ला  निघालो  होतो.
  अहमदाबाद  हायवेवर  ही तूरळक  वाहतूक  वर्दळ  होती  त्यामुळे  मी गाडी  सूसाट  दामटवित होतो .

मागील  सीट  वर  ऋचा  व  वीणा  ची  दंगा  मस्ती  सूरू  होती.

अचानकपणे  समोर  एक  बाईकस्वार   स्लीप  झाला  आणि  मी  तातडीने ब्रेक  दाबून  गाडी  थांबवली. .
.........हूश्श. ........वाचलो. .

मागे  बेसावधपणे  बसलेल्या  मूली  अचानकपणे  पूढे  आपटल्या........

" काय  हे  बाबा"  ?                 "कसा ब्रेक  लावता  हो " ?
पडले ना मी .....  मोठी कन्या " ऋचा "  वैतागून  म्हणाली

वेडा  आहे . बाबा  नूसता  ......   नीट  चालव  ना  गाडी. ...लागलं  मला डोक्याला ..   ...अस .काय  करतोस.??? .....  आमचं   लहान पिल्लू  "वीणा " रागावून  म्हणाली .

"साॅरी हं ,  अग  ब्रेक  नसता लावला तर  अपघात  झाला  असता
....गाडी जागेवर  थांबली  म्हणून  नशीब  ! .".....मी उसासा  टाकून  म्हणालो.

"बर  झालं  बाबा ब्रेक  बनवतात  सर्व  गाड्यांना  थांबवायला  " .. ... आमची छोटी वीणा म्हणाली

"अग  ब्रेक  आहेत  म्हणून  नाही  तर  गाडी थांबविण्यासाठीच  ब्रेक  दिलेले  असतात. "....मी  समजवून  दिले.

"नाही बाबा , मला नाही पटलं तूमचं."
'ब्रेक ' चा  ऊपयोग फक्त  गाडी  थांबविणे नसून  आणखी  काही  वेगळे  महत्वाचे कारण आहे  त्या  पाठी ."....  ऋचा मला म्हणाली

छे! !  काहीतरीच  काय ?
या  पेक्षा  दूसरे  कारण  नाही ... ब्रेक चा  उपयोग  गाडी  थांबवणे  ईतकच. ......मी  ऋचा  ला  समजावू  लागलो.

पण  तीने  तिचा  हेका  कायम  ठेवत  म्हणाली,

" बाबा  विचार  करून  सांगा  बर,  आणखी  काय  महत्वाचे  कारण  असेल  गाडीला ब्रेक  लावण्यापाठी.?"

"डोक  नको  खाऊस , दूसर  काहीही  कारण  नाही....नीट  बसून  घ्या  आणि  हो आता मस्ती  नको. ......माझा आवाज  थोडा  चिडचिडा

ऋचा मात्र ईरेला पेटली....

  ," आणि मी जर  दूसर  कारण  सांगितल  तर  आईसक्रीम  द्याल. ...

Done  !!  दिले  समज  , पण  मला तू  दिलेले  कारण  पटायला हवे    ! फालतू  'पीजे ' नाही चालणार. .हो .". चल  बोल  पटकन". ...ऊत्सूकता  वाढल्याने  मी  म्हणालो

"बाबा 'गाडीला  ब्रेक  आहेत  म्हणून  आपण  गाडी  थांबवू  शकतो , हे जरी खरं  असलं  तरी,  ब्रेक  आहेत  म्हणूनच   तर आपण  गाडी वेगाने  चालवू  शकतो ...... .

जेव्हा  माझ्या  साईकल  चे ब्रेक  नीट  लागत  नाहीत  मी  वेगाने नाही  चालवू  शकत  या ऊलट जेव्हा  तूम्ही  ब्रेक  दूरूस्त  करून  आणता  तेव्हा  मी  मस्त  वेगात  साईकल  चालवू  शकते. ....
.
म्हणजेच  ब्रेक  हे  वाहन  वेगाने  चालविण्यासाठी असतात  की  नाही  "

आता आपल्या  गाडीला  ब्रेक  नसते तर  तूम्ही  ती  चालवू शकाल  का  ?
आतल्या  आरशात  तिचा चेहरा  माझा  हरण्यातही फूललेला  चेहरा  टिपत  होता.

मंडळी  आयूष्याच्या  प्रवासाचेही अगदी असेच  आहे.

या  प्रवासात  अनेक  संकट  , अडथळे,  कठीण  काळ, अपयश , निराशा   असे  ब्रेक  लागत  असतात."
.......आपल्याला  वाटत  हे  सारं  माझा प्रवास  थांबविण्यासाठीच  आहे. ......

पण  मित्रांनो  हे  असे  ब्रेक  असतात  ते  तूम्ही  , नवीन  जोमाने  ऊर्जेने , भरदाव वेगाने  तूमच्या  लक्षापर्यत जावे म्हणूनच...
  काय  वाटतं  तूम्हाला. ....

ईतक्यात पूढे  चालणार्या एका  ट्रक  च्या  मागे  लिहीलेल्या  ओळी  दिसल्या  .......
ईतर  वेळी ट्रक  पाठीमागे लिहीलेल्या  निरर्थक  ओळींचा  आज  निराळा  अर्थ  समजत  होता.

.......नजर  को बदलो
.......नजारे  बदल  जाएंगे  ।
........सोच  को  बदलो
......  सितारे  बदल  जाएंगे  ।

"चला ऊतरा ,  आईसक्रीम  पार्लर  आलं  आणि  एक सोडून  दोन  घ्या  खूशाल ",  ..... मी  गाडी  थांबवत  म्हणालो

व्वा  ...Love  you  बाबा   ...एकदम  दोन दोन  आईसक्रीम  .....दोघीही एकसूरात ओरडल्या. .........

बायको  डोळे मोठ्ठे  करून   म्हणाली
, " अरे टाईमपास  होईल, ऊशीर  होईल  जायला  आपल्याला   ."

"अग  ईतका  लाॅग ड्राईव्ह  आहे  ,
या  प्रवासात  " एक ब्रेक  तो  बनता  है  ।   मी हसत  म्हणालो .

Let's  enjoy. .......

माझी लेखनयात्रा  🌈
योगेश जोशी
वज्रेश्वरी / ठाणे

Friday 26 February 2016

" हरवले आहेत "

चिंतनिका जीवन एक " संघर्ष " 🌹

           .    योगेश जोशी
.             वज्रेश्वरी / ठाणे

        " हरवले  आहेत "

वर्तमान पत्रात ' हरवले आहेत ' या सदरातील  बातमी वाचली  आणि
प्रश्न  पडला
"ऐन  उमेदीत  माणसं  अशी हरवतात  कशी  ?"

TV  वरील  "आपण  यांना  पाहिलंत का  ? " या  कार्यक्रमाची  आठवण  झाली .

हरवलेल्या माणसाबद्दल   आपल्याला  सहानुभूती  वाटते  पण  माणसे सापडलेली  समजत  नाहीत.
कारण ' हरवणे ' ही बातमी होते.. सर्वाना  कळणे  गरजेचे..
पण ' सापडणे ' नाही  कळले ..
तरी  चालते. ती  बातमी  होत  नाही

भीमाशंकर  ट्रेक  करत  असताना मी वाट  चूकलो. *  ( पून्हा  तेच...  चूकलो  मी  पण  वाटेवर  ढकलून  द्यायचे...  चूकली  म्हणुन )

एका गूराख्याला म्हटल ....

" मी हरवलोय  "

तो  हसला

"हसायला काय  झाले  ?"... मी

"आलात  कूठून ?" ....त्याचा  प्रश्न

"कर्जत  , खांडस हून.".. .माझे ऊत्तर


"कूठे  निघालात ?"......पून्हा  प्रश्न

"भीमाशंकर ".....माझे ऊत्तर

"आता कूठं आहात "?... त्याचा प्रतिप्रश्न

"गणेश  घाटा  च्या जवळपास  असेन " .............. अंदाज  घेत  ऊत्तरलो.

हसण्याचे  कारण  सांगत  तो  म्हणाला,

" कोठून  आलात? , कोठे  आहात ?,  व कोठे जायचे  आहे  ?" हे जर  तूम्हाला  माहीत  आहे ....तर.........

तर..  तूम्ही ' हरवलेले ' नाहीत  तर  'भरकटलेले ' आहात,  ..

तूम्हाला  मार्गदर्शना  ची गरज  आहे. "
हे ऊत्तर  खूप  काही देवून  गेले

हरवलेल्या  माणसांना  त्यांच्या  लहानशा  'आकाशात ' योग्य  ते  मार्गदर्शन  न  मिळाल्याने  ती  जमिनीवर  हरवतात. .....

तर  काही  माणसं  स्वतःला  हरवून  घेतात..........  ओळखी  च्या  माणसातून अनोळखी  माणसामध्ये  जातात........................... .   आपला जीवाभावाचा माणूस  शोधायला.

मग  अशा हरवलेल्या  माणसांचा  फोटो  दिला जातो,.....  फक्तं  फोटोच  देता  येतो ........... त्या शिवाय  त्यांच्यापाशी  काय  असणार,

तो  फक्त 'दिसतो  'कसा ,?
हेच ठाऊक  असत  त्यांना

त्याच  मन  कसं  आहे ?.. कूठे  आहे ?....

हे नसत  समजलेले  त्यांना.

...म्हणून तर  हरवतो  तो.............
" मन " समजल  असत  त्याच  तर  तो  हरवला  नसता. ...

तर  काही  माणसं  घरातच  हरवतात  ....माणूस  घरात  दिसतो.......   दिसत राहतो ....पण  सापडत  नाही. ....

'जनात  राहूनही  विजनवासाचा  अनूभव  प्रत्येकाला कधी  न  कधी  येतोच. '

अशा वेळी माणूस  सापडण्यासाठी  "वर्तमानपत्राची" नाही तर  "वर्तमान  प्रेमाची " गरज  असते. .....

.कारण  आभाळ  हरवलेल्या  माणसांना  ..आता  काळ्या  डोहाच्या  खोलीची ,....  धडधडणार्या   रेल्वेची ,   अंधार्या दरीच्या  खोलीची  .....किंवा किटकनाशकाचा  ऊग्रदर्पाची.. कशा..कशाची भीती  वाटत  नाही. ......

अशा माणसांकडे  सूख-दूखाला, संकटाना  सामोरे जाण्याचे  धैर्य  असलं......  तरी  व्यवहारी  जगाचा  "धूर्तपणा "अंगी  नसल्याने  साध  सहज  जगणे जीवघेणे  होते.

अशावेळी  त्याच्या   डोळ्यातील  आभाळ  आपल्या  डोळ्यात  द्यावे.

..विश्वासाचा  हात  पाठीवर  ठेवून  आपूलकीच्या , प्रेमाच्या  शब्दांचे  पूल  जोडले  की  माणस  हरवत  नाहीत. .......

मग कसली  वाट  बघताय.....अजून  ऊशीर  नाही   झालेला......
हरवू  नका आणि  हरवूनही  देवू  नका  !

'ईलाही 'अशांचे  वर्णन करताना म्हणतात .....

अंदाज आरशाचा  वाटे खरा असावा
बहुतेक माणसांचा तो चेहरा असावा

जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने तो मोगरा असावा

🌈  माझी लेखनयात्रा
          योगेश जोशी

आवडल्यास  शेअर करा

Monday 22 February 2016

"फ्रेन्ड "

चिंतनिका जीवन एक " संघर्ष " 🌹
          योगेश जोशी
       वज्रेश्वरी / ठाणे

    👫      "फ्रेंड "
         उर्फ  मित्र /मैत्रीण

मातृभाषेचा  अभिमान  असला  तरीही  मला हा आंग्ल भाषेतील  "फ्रेंड "हा शब्द  जवळचा  वाटतो .
मातृभाषेतून  हा  शब्दप्रयोग लिंगभेद  स्पष्ट  करतो. ..
फ्रेंड मधे  तसं  काही  नाही. ..
.मित्र  मैत्रीण  सगळ  आल.
कारण  पूरूषाची ' मैत्रीण ' व स्त्री  चा  'मित्र ' म्हटलं  की  सो  काॅल्ड सोफीस्टीकेटेड पण  बूरसटले मन  असलेल्या  नर - माद्यांची एकच  भूवई  वर  जाते .

तूमचे मित्र तूमची  खरी  ओळख  जगाला पोहचवत असतात, मित्रांवरून  तूमचं  'मूल्य ' ठरत  असत  त्या  मूळे  ही  निवड  काळजी  पूर्वक  असावी .

मित्र  श्रीमंत  जरूर असावेत  पण -ज्ञानाने, वृत्तीने, आचरणाने. ..बुद्धीमान ,आणि  अनूभव  संपन्न  असावेत. ..त्यांच्या  मनाचा  तळ  खोल  परंतू  स्वच्छ  असला  की  मग  भीती वाटत  नाही.

त्यांच्या चातुर्याने , बुद्धीकौशल्याने  किंवा  कधी  कधी  अगदी  साध्या भोळ्या सहज  केलेल्या  कौतूकाने तूमच्या  मनाला, गूणांना नवी  उभारी  मिळावी आणि  तूम्हाला  काय  जिंकायचय,  कशासाठी  जगायचे  याचा  शोध  आणि  बोध  त्याच्याकडून  मिळावा.

ऊनाडक्या करणार्याला परिक्षेच्या वेळी  पेपर  दाखवणे  म्हणजे  खरी मैत्री  नव्हे. .....

'दोस्ती  चा  वास्ता ' देत  एकच  प्याला  हातात  देवून  सूधाकराचा तळीराम करणारी  खरी  मैत्री  नव्हे

.  डिस्कोथेक  मध्ये  सोबत  नाचलीस तरच खरी  मैत्री  समजेन म्हणणारी  खरी  मैत्री कदापि  नव्हे.

मैत्री  निस्वार्थ , निस्सीम, असून  मती  व  नीती  ने  गतीमान  असावी. 
मित्र  उंच  असावेत पण  त्यांच्या  सावलीत आपण  खूजे वाटलो  तरी  शितलतेमूळे  त्याची खंत  नसावी .

लक्ष्य  कोठवर गाठायचे  आहे  , त्या  करीता  कोणते  सोपान  वापरायचे  आहेत  हे  सारं  सारं  मित्राने  स्पष्ट  करावे. ..पैसा,, पद, प्रतिष्ठा, लोभ,  स्वार्थ  न  बाळगता. ..

वेळप्रसंगी 'चूकतोस तू 'अशी  कानउघडणी  करून  स्तूतीभाटांच्या भाऊगर्दीत  मित्राने  राहू  नये.
परस्परांवरील स्वच्छ  टिका  दोघांनीही  मान्य  करावी. पण टीका  करताना  चूकांवर बोट  ठेवण्याचे नेमके  मर्म  त्यानेच  जाणावे.

लहानशा  चूकीने  सुंदर नाते  मातीमोल  करू  नये.
अतिपरीचयात जवळ  येताना  दूराव्याच्या काही  नियम  पाळले  नाहीत तर  गोंधळ  होईल  पण  पून्हा  योग्य  वेळेत  जवळ  आल्याने  जगणे सूसह्यही होईल.

मैत्री च्या  नात्याचे  मूल्यमापन  करण्याच्या  भानगडीत  न  पडता  आपल्या  आयूष्याचा  ताळेबंद  काहीही  न  लपवता  परिक्षणासाठी त्याला  सादर  असावा. ..त्यालाच  ठरवू  दे  तूमचा सच्चेपणा ,तूमची  निखळता. ....

दांभिकतेने भरलेल्या  या जगात  सच्चेपणाचा अंश  खर्या  खूर्या  मैत्रीत  सापडतो. अशी  मैत्री  होण्याला पूण्याई  लागते. ..

..कृष्ण-अर्जून,  कृष्ण- सूदामा  या परंपरेतील " मित्र " व राधा- कृष्ण  परंपरेतील " मैत्रीण"  लाभणे  हा एक  अपूर्व  योग  आहे.

म्हणून  रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात  फ्रेंड साठी  वेळ  काढा. ...बोला,  हसा  ,रडा, भांडा ,.

.......कारण  हा  दोघांचा  हक्कच  नाही तर  गरजही  आहे. .....

आणि ' मैत्री'  च्या  नात्याला  कोणत्याही  नात्याचे ' लेबल'  लावू  नका. ............

      'नात्यास  नाव  अपूल्या '
          देवू  नकोस  काही ,
        सा-याच  चांदण्याची
         जगतास  जाण  नाही .!

जेव्हा सारे  काही  संपल्यासारखे वाटत  होते  अशा अगतिक व अवघड  काट्यांच्या  पायवाटेवर  जिने शब्दांची  आश्वासक मखमल  पसरवून नवी  उर्मी  दिली.........   त्या  मैत्रिणीस अर्पण. ........  friend  forever. ..✍

🌈  माझी लेखनयात्रा
         योगेश जोशीय

Wednesday 17 February 2016

तृणफूल

चिंतनिका जीवन एक " संघर्ष " 🌹
         
                योगेश जोशी
              वज्रेश्वरी / ठाणे

🌹   🌱🌸  "  तृणफूल " 🌱 🌸 🍀

सिग्नल  ला  गाडी  ऊभी  राहीली आणि  एक  छोटी  मुलगी मागच्या  सीटजवळील काचेवर  'टक  टक ' करू  लागली .

गूलाब फूले  आणि  कसलीतरी  पूस्तके  विकत  होती. ..

.मी  मागे वळून  आतूनच  तिला  ओरडून  डोळे  मोठ्ठे  करून  ..हातवारे  करून  तिला  'चल  पूढे  जा !!  या अर्थी  केले. ..........

पण  हिंमत बघा..............
............तीने  मला न  पाहील्या सारखे  केले... मूलींना  पहात..  छान  हसत  राहीली. ..

. ..........राग  तर  आलाच  ....तिचे लक्ष  मूलीच्या बिस्किटांकडे  असावे या शंकेने. .....मी मूली ला  म्हणालो  ,"वीणा , एक बिस्किट   पूडा  दे  तिला "
वीणा ने  आनंदाने  काच  खाली  करून  तो  दिलाही.

मागच्या  वाजणार्या हाॅर्न वरून  सिग्नल  सूटल्याचे  भान  आले. ..गाडी सूरू केली ..आणि. .
वीणा  माझ्या  पूढे  हात  नाचवत  म्हणाली
" बाबा बघा,   त्या मूली ने  मला  कीती  छान !   गूलाबफूल दिलय. "

त्या टपोर्या फूललेल्या कळीत, त्या  मूली चा  हसरा  चेहरा  दिसू  लागला. ......

आणि  माझा  मलाच  राग आला. ...मी तीला  दटावायला नको  होते. ..माझे मन  खाऊ  लागले  ...मी  ओशाळलो. ......काय  हे  ?

अनेकदा  असच  होत. ..
....आपल्याला आपल्या  पैशाच्या ताकदीचा  ,. .. बूद्धीच्या  ताकदीचा ........राजकीय  ताकदीचा. ....गर्व  होतो. .......प्रत्येकवेळी  त्याच्याच  वापराने  प्रश्न  सूटतात  असा  भाबडा  विश्वास  वाटायला  लागतो. ......पण  खर  तर  ह्या  सर्व शक्ती  क्षणभंगुर  असतात. ....

साधे  प्रेमाचे  चार  शब्द,  निखळ,  निर्व्याज   हास्य ह्या  पूढे  ह्या  शक्ती  कुचकामी  ठरतात. .......

आणि  मन  भूतकाळात  जाऊन  ईयत्ता  सहावीच्या  वर्गात जाऊन  बसलं..
. ....मला आवडणारी  कविता  बाई  शिकवत  होत्या  .......
पण  ह्या  लहानशा  प्रसंगामूळे................त्याचा नेमका   अर्थ. ...समजत  होता. ...नव्याने.

....
🌿"मी फूल तृणातील इवले 🌹

जरी तुझीया सामर्थ्याने 
ढळतील दिशाही दाही
मी फूल तृणातील इवले 
उमलणार तरीही नाही. 

शक्तीने तुझीया दिपुनी
तुज करतील सारे मुजरे 
पण सांग कसे उमलावे 
ओठातील गाणे हसरे? 

जिंकील मला दवबिंदू 
जिंकील तृणाचे पाते 
अन स्वत:स विसरून वारा
जोडील रेशमी नाते 

कुरवाळीत येतील मजला 
श्रावणातल्या जलधारा 
सळसळून भिजली पाने 
मज करतील सजल इशारा

रे तुझीया सामर्थ्याने 
मी कसे मला विसरावे? 
अन रंगांचे गंधांचे 
मी गीत कसे गुंफावे? 

येशील का संग पहाटे
किरणांच्या छेडीत तारा;
उधळीत स्वरातुनी भवती 
हळू सोनेरी अभीसारा?

शोधीत धुक्यातुनी मजला 
दवबिंदू होउनी ये तू 
कधी भिजलेल्या मातीचा 
मृदु सजल सुगंधीत हेतू!

तू तुलाच विसरुनी यावे 
मी तुझ्यात मज विसरावे
तू हसत मला फुलवावे 
मी नकळत आणि फुलावे 

अगदी  पून्हा पून्हा  कवितेचे  शब्द  डोळ्यासमोर  येत  होते

🌈 माझी लेखनयात्रा

Monday 15 February 2016

"पाचर "

चिंतनिका जीवन एक " संघर्ष "
   
           योगेश जोशी
         वज्रेश्वरी / ठाणे

            "  पाचर "

परवा अनेक  प्रेमीयूगूल माळशेज  घाटात  माकडांना  बिस्किटे  देताना  पाहिली ...तो  तिच्या  हातात  एक  एक  बिस्किट देत  होता. ..ती  हवेत  भिरकावत होती. ...माकडे ऊड्या  मारून  पकडत  होती. .....एका  अर्थी  दोघांच्याही माकड चेष्टा  सूरू  होत्या. ..
             सहजच  मनातल्या  मनातल  एका  पीजे  केला  ,"  ही  या माकडाला  एवढा  जीव  लावते  तर  जो  खेटून  ऊभा  आहे  त्याला  किती  जीव  लावेल  😄

आणि  माकडांच्या  टोळीची वाचलेली  गोष्ट आठवली
....झाडांवर  एक  माकडांची  टोळी  रहात  होती. .लांब शेपटीची.....भली  थोराड  माकड. ...
जवळच  खाली  सूतार करवतीने लाकडाचे  ओंडके कापीत होते. ..त्यात  माकडांचे  भारी  लक्ष. ...दूपारी  विश्रांती ला  सूतार मंडळी  गेल्यावर. ..भला  थोरला  टोळी  नायक  माकडोबा  खाली  उतरला. ...कापलेल्या  ओंडक्याच्या  फटीत  शेपूट  सोडून  ऐटीत  पाचरीला हात  लावला. ......फट्याक ........ पाचरीने काम  चोख  बजावले......शेपूट  तूटली .........तोबा ... तोबा. .....ओय  ...ओय. .... काय  करावे  ?    रडावे  ? ....ओरडावे  तर  ....हसे  होईल. .......मग  उसने  अवसान  आणून  हसून  म्हणाला. ....व्वा  फारच छान. ..काय  गार  वाटतय. ..

..झाल  .......मग काय. .......... ...एकेक  करत  माकड  खाली उतरत गेली. ...
शेपट्या  तूटतं गेल्या  ...पण
"  हू नाही की चू नाही "   वेदना  होऊनही. ..कीती  छान !  मस्तच. .........

सहनही  होत नाही  सांगताही येत  नाही. ........ज्याने  खाल्ला  तो  व नाही  खाल्ला  तो  ही. .......असा हा  लग्नाचा  लाडू .......पण  तरीही  आपण  तो  खातोच. ..

सजवून -धजवून, वाजत - गाजत  एका  नव्या  जीवाला  आपल्या  घरी  आणतो. ......नव्याची  नवलाई  संपली  की ....मालकीची,  स्वामित्व,  स्वाभिमान,  मान, ईत्यादी  भावना  जागृत  होतात  आणि  भांड्याला  भांडे  लागते. .....
कूरघोडीच्या प्रयत्नात  वरातीमधील  घोडा  गाढव  वाटू  लागतो. .........

कायद्याच्या नजरेत  लग्न  हा करार  असेलही  पण  "करार " आणि  "कूरकूर" हे एकाच  अक्षरांपासून का  बर  झाले असावेत  ?

"तो " कीती  कमवतो  या पेक्षा  तो  "तिच्या " साठी  कमवतो  ही  जाणीव  "ती" विसरते  ....
आणि  आधी  चंद्र  चांदणे  तोडून आणायला  निघालेला " तो " कीराणा , दळण  आणताना त्रागा  करू  लागतो. ....

एव्हाना  दोघांनाही  एकमेकांच्या गूणांपेक्षा दोषच   ठळकपणे अधोरेखित झालेले  असतात. ...........अशा वेळी  कोणीतरी  एकाने  तडजोडी चे  खोडरबर  घेवून  या  आधोरेखा खोडायच्या असतात. ....पण  अखेर  खोडरबरच ते  झिजणार असत  ...म्हणून  एकानच न  वापरता  आळीपाळीने  पूरवून पूरवून वापरले  की  संपत  नाही. ..
कूरबूरी होणारच. ..पण  तेढ  वाढणार  नाही  याची  काळजी घ्यावी. ....
कारण  कितीही  फारकतले  तरी लग्न  म्हणजे  "पाचर "  थोडीच आहे  आणि  आपला  पूर्वज  जरी  'तो 'असला  तरी  आपण  माकड  थोडीच  आहोत.

🌈  माझी लेखनयात्रा

Sunday 14 February 2016

देवाघरचे लेणे

चिंतनिका जीवन एक " संघर्ष " 🌹

              योगेश जोशी
           वज्रेश्वरी / ठाणे

      🌹 देवाघरचे  लेणे 🌹

प्रेम  म्हणजे  प्रेम म्हणजे प्रेम असतं
तूमचं आणि  आमच  सेम  असतं  !

वयाच्या  निरनिराळ्या टप्प्यात  वेगवेगळ्या  आशयाच्या  कविता  आवडू  लागतात.

पण  पाडगांवकरांच्या  ह्या  ओळी  मात्र  स्थल, काल, वयाचे  बंधन ,मर्यादा  न  मानता  प्रत्येक  टप्प्यावर  भावतात , आनंद  देऊन जातात. एक  वैश्विक  सत्य  सांगतात.

             अगदी  कोणतीही  पूर्वसूचना  न देता  ,ध्यानीमनी नसताना  ,अचानक,  अकस्मात्, पणे   "ते " घडेल .

           मी  प्रेमात  पडलो  म्हणण्यापेक्षा प्रेमच तूम्हाला  शोधून  काढेल.
             अचानकपणे  आभाळ  भरून  याव  आणि  वळिवाच्या  जोरदार  सरींमध्ये तन - मन  चिंब भिजून  जावे. ...अगदी  तस्सेच. .....
तसेच  होईल  प्रेम .

संकट  दूख  आल्यावर  सहजपणे  तक्रार  येते  की
, या  ईतक्या  असंख्य  लोकांच्या  भाऊगर्दीत  माझ्याच  वाट्याला  का  हे  सारे  ???,
   अगदी  तसेच  प्रेमाचही...ईतक्या  भाऊगर्दी  त  मीच  का  ? ?????

ह्या  प्रश्नाचे उत्तर  नसते.

होकार, - नकार,  
शक्य-  अशक्य '
सार -असार ,
नीती - अनिती
, रिती -भाती, 
जाती - पाती,

ह्या  सार्‍या  निसरड्या  अवघड  पायवाटा  ओलांडून  " ते " अलगद पणे  तूमच्या  बोटांवर  विसावेल..

    अगदी  पूष्करणीतील अनेकविध फूलांमधून  नेमक्या  फूलावर बसणार्‍या  फूलपाखरा प्रमाणे. ..

अस  झाल  की  तूम्ही  गोंधळाल.......अस्वस्थ  व्हाल. ....विचारात  पडाल. .....हे सार  समजायला .....उमगायला. ...नक्कीच  थोडा  वेळ  लागेल.

.....त्याला  प्रतिक्रिया  देवू   ? की  प्रतिसाद   द्यावा  ? ....... आणि  द्यावा  तर  कसा द्यावा  ????,,

या संभ्रमात , द्विधा मनस्थितीत  नक्कीच  थोडा  वेळ  जाईल ......
काय  हे भलतच ? काय  हे  ? अस  कस  ??

ह्या  सार्‍या  प्रश्नांच्या गोंधळातही   जर  तूमच्या  ह्रदयाचा  एखादा  ठोका  चूकत  असेल. ..तर. ...तर. ...तर  काय  ?

अहो पूढे  होऊन  प्रेमाला  अलिंगन द्या.  मूक्त  हस्ते  स्विकार  करा. ......पण  डोळसपणे  बर. ...

प्रेम  भिन्न  भिन्न  लोकांना अगदी   समीप  आणते  पण  जवळ  येताना  दूराव्याच्या  काही  नियमांचे  भान  हवे ...नाहीतर  सतारीच्या  सूरांची 'सम ' गाठता  येत  नाही.

पाडगावकर  म्हणतात ...

"ईतके  आलो  जवळजवळ  की        .    .    जवळपणाचे झाले  बंधन ,
उमटावयाला  सूर  हवे , तर  हवेच      .       तारांमधूनी अंतर. .."

प्रेमात एकदूसर्याला बांधण्यापेक्षा बांधिलकी  महत्वाची  , नाही  का  ?

अहो प्रेमात  आशा - अपेक्षा  ईच्छा  ह्या  असणारच
  पण  त्याच  बरोबर  मनाच्या  मर्यादा व बूद्धीची मान्यता  ही तितकीच  महत्वाची. ..नाही  का?

प्रेमाची  लांबी - रूंदी  ची  परिमाणे मोजण्यापेक्षा...खोली  महत्वाची. ..नाही का  ?

प्रेम  मनाच्या तळापासून  उन्मूत्त,  ,  ऊत्फूर्त, आणि  अनिवार  असावे  पण  चौखूर  ऊधळलेले नक्कीच  नसावे. ..

प्रेम  पवित्र , शांत,  संयमी,  शालिन असावे  पण  अगतिक  व  लाचार  नसावे. ....

प्रेमात  हार -जीत , यश -अपयश  अस  नसतच  मूळी. ..अपयशी  झालात  तरीही  प्रेम  वेगळ्या  अंगाने, वेगळ्या  रंगाने; वेगळ्या  रूपात  तूम्हाला  पून्हा  भेटणारच  असते. ..खात्रीने. ..फक्त  ओळखणारी  नजर  हवी.

ऊगीचच त्याला कोणत्याही  अटी  शर्ती  व करारात  अडकवू  नये
कारण  प्रेम  म्हणजे  काही  सरकारी  "दस्तावेज " नाही  तर  "दिलों  की  दास्तान है "

तेव्हा  प्रेम  भरभरून  करा ...
हातच  न राखता....कारण  जितकी  पखरण  कराल ..... ऊधळण  कराल  त्याचा  कैक  पटीने  परत  मिळेल
. ..प्रेम  जोडा व जोपासा ...

   " प्रेम   घरावर , व कुटुंबावर  करा
       आणि  जगावरही   करा "

" प्रेम आपल्या छंद आवडीवर  करा  आणि कामावर,  कर्तव्यावरही करा"

  " प्रेम  सोने -नाणे संपत्तीवर करा
आणि त्या 'अर्थ' चा अनर्थ न  करणार्‍या  सदबूद्धीवर करा "

"प्रेम लाडक्या  गाडीवर अलिशान   बंगल्यावर  करा "
आणि  निसर्गाच्या कलाकृतीवर ही
करा "

"प्रेम  गीत-संगीत, नृत्य  व सूंदर  चित्रांवर  करा
आणि  अनूपम सूंदर  चरित्रावरही करा "

"प्रेम  स्वतःच्या गूणांवर ,सौंदर्यावर  करा
आणि  ही  जाणीव  करून  देणार्‍या "प्रेरणे"वरही  करा ।

मंडळी  प्रेम  हे  सौभाग्य आहे ...अलंकार  आहे  ..प्रत्येकाला  मिळेलच  असे नाही  तेव्हा  त्याचा  आदर  करा. ..दवडू  नका. .अभिमानाने  मिरवा पण  प्रदर्शन  मांडू  नका. .....

.कारण ...' प्रेम'  हा दर्शनाचा  विषय आहे  प्रदर्शनाचा नाही.

म्हणून  मनस्वी  प्रेम  करा. .

रोजच्या  निकटच्या  सहवासात  तर  होईलच  प्रेम  व्यक्त
पण  दूरत्वानेही परस्परातील  धागा  न  विरता ते  राहत  अभंग ..

पाडगांवकरांच्या  ओळी  आठवल्या
       "  सोबतीला  चंद्र देते
         अंतरीचा  ध्यास  देते
         तू  जिथे  जाशील  तेथे
        मी तूला  विश्वास  देते  "

विश्वासाने  ज्या  खांद्यावर  डोकं  टेकाव  अस  प्रेम  म्हणजे......

         "देवाघरचे  लेणे  "

त्याची  'भक्ती ' केली  की  जगण्याची  नवी ' शक्ती ' मिळते ।

अशीच  जगण्याची  नवी  शक्ति  देणार्या  माझ्या  " प्रिय सखीस "       .        फक्त  दोनच  ओळी ....

     "तू  छान  आहेस "
              आणि
"मला तू खूप  आवडतेस "

🌈  माझी लेखनयात्रा