" मी आजच्या अतिथींना विनंती करतो की त्यांनी दिप प्रज्वलन कराव. ......
अस निवेदक म्हणाला आणि स्मितहास्य फूललं....अतिथी. ... माझ्याशी महीनाभर आधी बोलून तारीख , वार , वेळ नक्की करून कार्यक्रम सादर करण्यासाठी निमंत्रित केलाला मी "अतिथी " कसा काय ठरलो ??
"तिथी , वार, वेळ न ठरवता जो येतो तो अतिथी "
पण अगदी मोठमोठय़ा कार्यक्रमाच्या पत्रिकेत देखील "प्रमुख अतिथी " अमूक अमूक अस चक्क दहा दिवस आधीच लिहिलेले असत. ........असो
पण खरच विचार केला तर आजच्या काळ, काम, वेग या बंधनात पूरते गूरफटून घेतलेल्या टेक्नोसेव्ही मोबाईल जगतात "अतिथी "म्हणून येण किंवा जाण शक्य आहे का ? .
पंधरा वीस वर्षापूर्वी ही मजा नक्कीच होती.
"कालपासून तूझी सारखी आठवण येत होती आणि आज तू हजर अस म्हणताना तो खूललेला चेहरा दिसायचा "
"आलो होतो जरा या बाजूला बरेच दिवस भेट नाही ' तूमच्या हातची थालीपीठांची आठवण झाली चला तेवढच निमित्त "
"बसा हो भावोजी कांदा चिरलेलाच आहे दहा मिनिटांत थालीपीठ देते आणि आज दही ही फार सूरेख लागलय हो । आलेच "
असा संवाद जर आज ऐकवला तर " बापरे !!! कीती मॅनर्सलेस पणे वागत होती माणस ? न कळवता असे कसे कोणाच्या दारात उभी ठाकू शकतात ? भयंकर आहे.
अशा प्रतिक्रिया नक्कीच येतील
कारण अतिथी परंपरा आता कालबाह्य झाली आहे नव्हे ती हद्दपार होणे कीती महत्वाचे आहे हे आम्हाला पटले आहे.
आम्ही स्वतःभोवती एक सोयीस्कर लहानसं वर्तूळ आखून घेतलय त्या परिघामध्ये उपयुक्ततेनूसार माणस वाढतात किंवा कमी होतात ....
येतोय ..निघालोय. ..बस मिळाली. ..ट्रेन पकडतोय...लिफ्ट मधे आहे अशा अपडेशन मधे कोठेतरी अचानक मिळणारा भेटीचा सूखद धक्का हरवून गेलाय .......
परवा मूली ने "अतिथी देवो भवः"
चा अर्थ विचारला ....तिच्याच भाषेत सांगायचं म्हणून म्हटलं outdated software आहे हे आता नाही कूठे install कूणी करत ...........
एकदा आपल्या आवडत्या व्यक्तीला न सांगता न कळवता भेटून तर पहा. .....old version कीती user friendly होत याचा अनूभव नक्कीच येईल ...
चिंतनिका जीवन एक" संघर्ष " 🌹
दिसा माजी काहीतरी लिहीत जावे
No comments:
Post a Comment