Monday 30 May 2016

काय भूललासी वरलीया रंगा

काल  परवा  अचानक  पणे     what's app वर  एक  विनोद  वाचनात  आला......नंतर अनेक  ग्रूपवर  आला म्हणजे  viral   झाला होता .

भाऊ  कदम  मूलगी  पहायला  जातो  मूलगी  काळी  असते  तर  मूली चा बाप  कार  द्यायला  तयार  होतो
त्यावर  मूलगा  म्हणतो  तूमच ठीक  आहे  पण  आमच्या  पूढील  पिढीत  मूलगी  खपवायला  आम्हाला  हेलिकॉप्टर  द्यावे  लागेल  त्याचे  काय  ?

साधारण  अशा  आशयाचा  हा विनोद..
खर  तर  विनोद  हा विनोद  म्हणूनच  घ्यावा  हे  माहीती  असूनही  माझ्या  सारख्या  विनोदी  माणसालाही यावर  हसू आले नाही .
कूठेतरी  हा विनोद मन  विषण्ण  करून  गेला.

गोरा  ईंग्रज जाऊन  काही  तप  गेली  तरी  गोर्‍या  रंगाची  गूलामी मात्र  आमच्या  मानगुटीवरून  काही केल्या ऊतरायला तयार  नाही.

  गोरेपणाची  गूलामगिरी कूठेतरी  खोलवर घट्ट  रूजली गेली  ।

याची  सूरूवातच  जन्माअगोदर पासून  सूरू होते.
अमूक  तमूक  खा  ग   बाई   ... दूध केशर  घे  ...बाळ  कस  गोरगोमट  होईल  हं. ...

खरं तर  मूलगाच हवा..... पण  मूलगी  झाली तर  मात्र  सूंदर  गोरीपानच  हवी  हो  !

पाळण्यात  असताना  कमेंट  आल्या " व्वा !!  काय  छान  गोरीपान  आहे हो मूलगी. """..

बालपणी  गाणं  कानावर  आले  गोरी गोरी  पान  फूलासारखी छान  दादा मला एक  वहीनी  आण. ..

तारूण्यात  कानावर  शब्द  आले  चांदी  जैसा रंग  है  तेरा ....सोने  जैसे बाल......

मी गोरी आहे म्हणजे नक्की  काय  आहे  ???

याच  ऊत्तर  मोठी  होत  गेले  आणि  कळत  गेल ...

समजायला लागली मला माझ्या गोरेपणाची किंमत...

रंग देहावरून फिरणाऱ्या ऊत्सूक नजरा. ..
सलगीसाठी धडपडणाऱ्या.....
प्रेमात पडणारी, ......मागे लागणारी पोरं....
घरचे,
बाहेरचे,
नातलग,
शिक्षक
सगळ्यांच्याच नजरेत  ' माझ्या ' आधी  दिसणारा माझा 'गोरेपणा'
सगळ्यात  आधी  अधोरेखित  होणारा

मी गोरी आहे म्हणजे काय आहे?

मैत्रिणी म्हणतात,

"तुला नाही कळणार काळेपणाची दुःखं !!!!

"टीव्हीवर दिसणाऱ्या गोऱ्या रंगासाठी  होणार्या  हजारो  कोटींच्या  ऊलाढालीच्या   बाजाराला.....क्रीम  ऊपाय  जाहीरातीःना  ठेवू नकोस नावं.....

दररोज  नवीन  अॅडव्हान्स फार्मूला  सह  काही दिवसापासून  ते  आठवड्यात   गोरेपणाची  हमी  देणारी हमखास  ऊत्पादने....
आमच्यासाठी  वेड्या आशेचा   किरण  असतात ग. . ......त्यात  घरगुती  नूस्के ...नो  साईड  ईफेक्ट  वाला आयूर्वेद  ही  मागे  कसा राहील ...

गोरेपणाला कधीच  नसत  दूःख.....
नसतो  कसला  त्रास ...
या  ऊलट
"अग लग्नाच्या बाजारात  सगल्यात जास्त  तूझाच भाव..""

खरच .....

मी गोरी आहे म्हणजे काय  ?????

माझ्या रक्ता मांसावर चढलेली एक त्वचा.....
फक्त  त्वचा ....
आई बाबां कडून वाहून आलेले जीन्स.....
या उपर माझं कर्तृत्व काय ?......
शून्य. ..

पण तसही ते  कतृत्व बघायचे आहे कुणाला    ???

माझी कातडीच सगळ सांगते....

का   ???
ईतर  रंगाच्या  त्वचेखाली... भावना , प्रेम , ओढ , काम भावना' शृंगार. ..  गूणवत्ता, कर्तृत्व  काही नसेल.??.  की कमी असेल. ..??.

पण  याचा विचार  कोणाला करायचाय. ..

मग मी गोरी आहे म्हणजे नेमकं काय आहे??

कुणास ठाऊक??

मी नक्की कोण आहे?

गोरी बाई,
काळी बाई,
सावळी बाई
की नुसती बाई  
हो  हो  नूसती  बाई ....

माणुस नाही ...आधी बाई...

माझ्या कातडीच्या रंगा वरुन...
त्यांना,
ह्यांना,
ह्याला,
त्याला
सगळ्यांनाच्
काहीतरी म्हणायच असत ...सतत..

तू गोरी ना म्हणून...
तू काळी ना म्हणून...
तू सावळी ना म्हणून...

मग होते हळूहळू सवय या 'म्हणून' ची

आणि तिला ही चढतो कैफ तिच्या रंगाचा
केव्हा मग होते ती दुःखी तिच्याच रंगामुळे..

कोणी विचारतं का तुझा बाप, भाऊ, नवरा, मित्र, प्रियकर
यांच्या कातडीचा रंग कसा आहे...

छे ! !  छे ! ! काहीतरीच  काय ?
आजिबात अस  काही विचारायचं नसतं...
कारण या मातीसाठी
पुरुष कर्तृत्व असतो आणि स्त्री फक्त  भोग...

काळा  फळा ..........हवा
काळा  पैसा. ..........हवा
काळी  माती........... हवी
काळे  ढग ............. हवेत
काळी  तिट............. हवी
काळे  डोळे ............  हवे
काळा  विठ्ठल ......  हवा
काळा  कृष्ण  .........हवा
पण ...........
पण  ........पण
राधा  मात्र  गोरीच हवी ........
तेच  तिचे कर्तृत्व. .......
तीच  गूणवत्ता. ........

किती करकचुन बांधून टाकले आहे
आपण आपल्यालाच...

मग सौंदर्य दिसत नाही....
आनंद दिसत नाही, ...
कर्तृत्व दिसत नाही....
दिसतो फक्त रंग.....

काळा...सावळा...
नाहीतर गोराही !!

शिवाय नोकारीतही म्हणे तुम्हाला
मिळते विशेष वागणूक..
तुला हवीये की नकोय हा मुद्दाच नाहिये...

पुरुषांना ही हव्या असतात गोर्‍या बायका
का तर वंश पुढे निघेल गोरा  !!

खरच  जर  फक्तं  गोरेपणात सौंदर्य  असत  तर  प्राचीन  मंदिरावरील  कमनीय  सौदर्यवतींची शिल्पे फक्त  संगमरवरी  दगडात असती  पण  ती  कोरली  गेली काळ्याशार  गंडकी पाषाणात. ..आजही मन  मोहीत करतात. ....

मग  जिवंतपणी  ही  फक्त  गोरेपणाची  अपेक्षा  व  सावळयाची उपेक्षा  ही  कसली मानसिक  गूलामगिरी की विकृती. ...

आफ्रिकन  आमच्या ईथे  येतो तेव्हा  तो निग्रो  असतो या ऊलट  एखादा  भिकार गोर्‍या  कातडीचा  जरी आला तर  तो  परदेशी  नागरीक   (foreiner ) ठरतो  ही कोणती  बौद्धिक  दिवाळखोरी .

आणि  संत  चोखामेळा सहज  आमचे कान  टोचून  जातात

ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा | काय भुललासी वरलिया रंगा || १ ||

कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा | काय भुललासी वरलिया रंगा || २ ||

नदी डोंगी परी जल नोहे डोंगा | काय भुललासी वरलिया रंगा || ३ ||

चोख डोंगी परी भाव नोहे डोंगा | काय भुललासी वरलिया रंगा || ४ ||

संदर्भ

डोंगा  - वेडा वाकडा  / वळणदार
कमान - धन्यूष्य
तीर  - बाण


🌈माझी लेखनयात्रा