Friday, 26 February 2016

" हरवले आहेत "

चिंतनिका जीवन एक " संघर्ष " 🌹

           .    योगेश जोशी
.             वज्रेश्वरी / ठाणे

        " हरवले  आहेत "

वर्तमान पत्रात ' हरवले आहेत ' या सदरातील  बातमी वाचली  आणि
प्रश्न  पडला
"ऐन  उमेदीत  माणसं  अशी हरवतात  कशी  ?"

TV  वरील  "आपण  यांना  पाहिलंत का  ? " या  कार्यक्रमाची  आठवण  झाली .

हरवलेल्या माणसाबद्दल   आपल्याला  सहानुभूती  वाटते  पण  माणसे सापडलेली  समजत  नाहीत.
कारण ' हरवणे ' ही बातमी होते.. सर्वाना  कळणे  गरजेचे..
पण ' सापडणे ' नाही  कळले ..
तरी  चालते. ती  बातमी  होत  नाही

भीमाशंकर  ट्रेक  करत  असताना मी वाट  चूकलो. *  ( पून्हा  तेच...  चूकलो  मी  पण  वाटेवर  ढकलून  द्यायचे...  चूकली  म्हणुन )

एका गूराख्याला म्हटल ....

" मी हरवलोय  "

तो  हसला

"हसायला काय  झाले  ?"... मी

"आलात  कूठून ?" ....त्याचा  प्रश्न

"कर्जत  , खांडस हून.".. .माझे ऊत्तर


"कूठे  निघालात ?"......पून्हा  प्रश्न

"भीमाशंकर ".....माझे ऊत्तर

"आता कूठं आहात "?... त्याचा प्रतिप्रश्न

"गणेश  घाटा  च्या जवळपास  असेन " .............. अंदाज  घेत  ऊत्तरलो.

हसण्याचे  कारण  सांगत  तो  म्हणाला,

" कोठून  आलात? , कोठे  आहात ?,  व कोठे जायचे  आहे  ?" हे जर  तूम्हाला  माहीत  आहे ....तर.........

तर..  तूम्ही ' हरवलेले ' नाहीत  तर  'भरकटलेले ' आहात,  ..

तूम्हाला  मार्गदर्शना  ची गरज  आहे. "
हे ऊत्तर  खूप  काही देवून  गेले

हरवलेल्या  माणसांना  त्यांच्या  लहानशा  'आकाशात ' योग्य  ते  मार्गदर्शन  न  मिळाल्याने  ती  जमिनीवर  हरवतात. .....

तर  काही  माणसं  स्वतःला  हरवून  घेतात..........  ओळखी  च्या  माणसातून अनोळखी  माणसामध्ये  जातात........................... .   आपला जीवाभावाचा माणूस  शोधायला.

मग  अशा हरवलेल्या  माणसांचा  फोटो  दिला जातो,.....  फक्तं  फोटोच  देता  येतो ........... त्या शिवाय  त्यांच्यापाशी  काय  असणार,

तो  फक्त 'दिसतो  'कसा ,?
हेच ठाऊक  असत  त्यांना

त्याच  मन  कसं  आहे ?.. कूठे  आहे ?....

हे नसत  समजलेले  त्यांना.

...म्हणून तर  हरवतो  तो.............
" मन " समजल  असत  त्याच  तर  तो  हरवला  नसता. ...

तर  काही  माणसं  घरातच  हरवतात  ....माणूस  घरात  दिसतो.......   दिसत राहतो ....पण  सापडत  नाही. ....

'जनात  राहूनही  विजनवासाचा  अनूभव  प्रत्येकाला कधी  न  कधी  येतोच. '

अशा वेळी माणूस  सापडण्यासाठी  "वर्तमानपत्राची" नाही तर  "वर्तमान  प्रेमाची " गरज  असते. .....

.कारण  आभाळ  हरवलेल्या  माणसांना  ..आता  काळ्या  डोहाच्या  खोलीची ,....  धडधडणार्या   रेल्वेची ,   अंधार्या दरीच्या  खोलीची  .....किंवा किटकनाशकाचा  ऊग्रदर्पाची.. कशा..कशाची भीती  वाटत  नाही. ......

अशा माणसांकडे  सूख-दूखाला, संकटाना  सामोरे जाण्याचे  धैर्य  असलं......  तरी  व्यवहारी  जगाचा  "धूर्तपणा "अंगी  नसल्याने  साध  सहज  जगणे जीवघेणे  होते.

अशावेळी  त्याच्या   डोळ्यातील  आभाळ  आपल्या  डोळ्यात  द्यावे.

..विश्वासाचा  हात  पाठीवर  ठेवून  आपूलकीच्या , प्रेमाच्या  शब्दांचे  पूल  जोडले  की  माणस  हरवत  नाहीत. .......

मग कसली  वाट  बघताय.....अजून  ऊशीर  नाही   झालेला......
हरवू  नका आणि  हरवूनही  देवू  नका  !

'ईलाही 'अशांचे  वर्णन करताना म्हणतात .....

अंदाज आरशाचा  वाटे खरा असावा
बहुतेक माणसांचा तो चेहरा असावा

जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने तो मोगरा असावा

🌈  माझी लेखनयात्रा
          योगेश जोशी

आवडल्यास  शेअर करा

3 comments:

  1. योगेशजी खरंच सुंदर लेखन....खऱ्या अर्थाने स्वत:च्या जीवनात हल्ली माणुस माणसाच माणुसपणच हरवून बसला आहे. स्वत: स्व त्व आजच्या काळात माणूस म्हणून खरोखरच अनुचीत पद्धतीने वापरत आहे. आपला लेख अनेक स्वत:हुन हरवलेल्या अनेकांसाठी प्रकाशवाट आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. उमेश सर मनापासून धन्यवाद
      आपण वाचता अभिप्राय देता असाच लोभ असावा

      Delete
  2. मस्तच .
    हरवला नाही भरकटला ....

    ReplyDelete