Showing posts with label योगेश जोशी . वज्रेश्वरी - ठाणे. Show all posts
Showing posts with label योगेश जोशी . वज्रेश्वरी - ठाणे. Show all posts

Sunday, 14 February 2016

अतिथी

" मी आजच्या  अतिथींना   विनंती  करतो की  त्यांनी  दिप प्रज्वलन  कराव. ......

अस  निवेदक म्हणाला  आणि  स्मितहास्य  फूललं....अतिथी. ... माझ्याशी महीनाभर  आधी  बोलून   तारीख , वार , वेळ  नक्की  करून  कार्यक्रम  सादर  करण्यासाठी  निमंत्रित  केलाला मी  "अतिथी " कसा  काय  ठरलो  ??

"तिथी , वार,  वेळ  न ठरवता  जो  येतो  तो  अतिथी "

पण  अगदी मोठमोठय़ा  कार्यक्रमाच्या  पत्रिकेत  देखील  "प्रमुख  अतिथी " अमूक  अमूक  अस  चक्क  दहा  दिवस  आधीच  लिहिलेले  असत. ........असो

पण  खरच  विचार  केला तर  आजच्या  काळ, काम,  वेग  या  बंधनात  पूरते गूरफटून  घेतलेल्या  टेक्नोसेव्ही मोबाईल  जगतात  "अतिथी "म्हणून  येण  किंवा जाण  शक्य  आहे  का  ? . 

पंधरा  वीस  वर्षापूर्वी  ही  मजा  नक्कीच  होती.
"कालपासून  तूझी  सारखी  आठवण  येत  होती  आणि  आज  तू  हजर  अस  म्हणताना  तो  खूललेला चेहरा   दिसायचा "
"आलो  होतो  जरा  या  बाजूला    बरेच  दिवस  भेट  नाही  ' तूमच्या  हातची  थालीपीठांची आठवण झाली  चला  तेवढच  निमित्त "
"बसा  हो  भावोजी  कांदा  चिरलेलाच आहे  दहा  मिनिटांत थालीपीठ  देते  आणि  आज दही   ही फार  सूरेख  लागलय  हो । आलेच "
असा संवाद  जर  आज  ऐकवला  तर   " बापरे !!!  कीती  मॅनर्सलेस  पणे  वागत  होती  माणस  ?   न  कळवता  असे  कसे  कोणाच्या  दारात  उभी  ठाकू शकतात  ?  भयंकर आहे.
अशा  प्रतिक्रिया  नक्कीच  येतील

कारण  अतिथी  परंपरा  आता  कालबाह्य  झाली आहे  नव्हे  ती  हद्दपार  होणे  कीती  महत्वाचे आहे  हे  आम्हाला  पटले  आहे.

आम्ही  स्वतःभोवती  एक सोयीस्कर  लहानसं  वर्तूळ  आखून  घेतलय  त्या  परिघामध्ये  उपयुक्ततेनूसार  माणस  वाढतात  किंवा  कमी  होतात ....

येतोय  ..निघालोय. ..बस  मिळाली. ..ट्रेन  पकडतोय...लिफ्ट  मधे  आहे  अशा अपडेशन मधे  कोठेतरी  अचानक  मिळणारा भेटीचा सूखद धक्का  हरवून  गेलाय .......

 
परवा मूली ने "अतिथी  देवो  भवः"
चा अर्थ  विचारला   ....तिच्याच  भाषेत  सांगायचं  म्हणून  म्हटलं  outdated  software  आहे  हे  आता नाही  कूठे  install कूणी  करत ...........

एकदा  आपल्या  आवडत्या  व्यक्तीला  न  सांगता  न कळवता  भेटून  तर  पहा. .....old  version  कीती  user friendly  होत  याचा  अनूभव   नक्कीच येईल ...

चिंतनिका जीवन एक" संघर्ष " 🌹

दिसा माजी काहीतरी लिहीत जावे

सुगंधी नाती

सूप्रभात मंडळी 💐

आकर्षण  म्हणजे  प्रेम  नव्हे  परंतू  प्रेम  म्हणजे  आयूष्यभराचे आकर्षण  असते ........
शब्द  तेच  फक्त  क्रम  वेगळा  व अर्थपूर्ण  सोहळा. .....

अनेक  परिचित  माणस  रोज  भेटतात 
परंतु  शिष्टाचाराची  घडी  थोडीशी विस्कटण्या पलिकडे त्यांचा व आपला संबंध येत नाही  (कसे  आहात,  जेवलात  ,काय  चाललय वैगरे  वैगरे ) 
रोज भेटी  घडल्या  तरी  मनाच्या  गाठी  पडत  नाहीत. ..

तर  काही  माणसं  एखाद्या भेटीतच जन्मोजन्मी चा दूवा साधणारी नाती तयार करतात भेटी झाल्या नाहीत  तरीही  मनाच्या  गाठी  पक्क्या  होतात ......

आणि  शब्दांच्या  सूरांनी अर्थाचं  गाण  रंगू  लागत  व आयूष्याची  मैफिल  सूगंधी होते. .....

अशीच  आयूष्याची  मैफिल सूगंधी  करणारी  अत्तराची  कुपी  प्रत्येकाच्या आयूष्यात कूठल्याही  वळणावर  येवू  शकते  फक्त फरक  एवढाच  की  काही  फक्त  कूपी च्या   सौंदर्यात  रमतात  तर  काही  ऊर भरून  खोलवर श्वास  घेतात .....व  स्वतः  कूपी  होतात. ..